Welcome, Guest |  Login  | 

Welcome to Moraya Prakashan Online Store

Article Details

small grey bullet

पुस्तक - काश्मीर धुमसते बर्फ 

जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल , जेष्ठ निवृत सनदी अधिकारी आणि राज्यसभेचे सदस्य जगमोहन यांच्या My Frozen Turbulence in Kashmir या इंग्रजी पुस्तकाचा मराठी अनुवाद 

अनुवाद - मो . ग . तपस्वी  , सुधीर जोगळेकर

जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल , जेष्ठ निवृत सनदी अधिकारी आणि राज्यसभेचे सदस्य जगमोहन यांचा काश्मीर विषयाचा अभ्यास दांडगाच नव्हे तर अन्य सर्व अभ्यासकांच्या  तुलनेत अद्वितीय आहे, त्याला अधिकारसंपन्नतेची जोड आहे.My Frozen Turbulence in Kashmir या त्यांच्या अभ्यासपूर्ण ग्रंथाने काश्मीर समस्येविषयीची एक विलक्षण जागृती तर समाजमनात केलीच, पण गेली ६५ वर्षे पाकिस्तानची या विषयाकडे पाहण्याची दृष्टी कशी सदोष राहिली आहे यांचेही दिग्दर्शन केले आहे.काश्मीर : धुमसते बर्फ या नावाने जगमोहन यांच्या या ग्रंथाचा मराठी अनुवाद सर्वप्रथम प्रसिद्ध झाला तो १९९२ साली... जेष्ठ पत्रकार , दिल्लीच्या राजकीय वर्तुळात मनाचे स्थान असलेले एक लेखक , ज्वलंत राष्ट्रभक्त मोरेश्वर गणेश तपस्वी यांनी तो अनुवाद केला होता.. मुळच्या इंग्रजी तजुर्म्याच ते मराठी रुपांतर असल्याने  त्याला अनुवाद म्हणायचं, अन्यथा ते अनुनादाकडे वळणारच लेखन अधिक होतं.. या हृदयीचे त्या हृदयी  घालण्याची विलक्षण क्षमता त्या मराठी तजुर्म्यात होती..आज दुर्दैवाने तपस्वी आपल्यात नाहीत...अन्यथा जगमोहनांच्या  मूळ इंग्रजी लेखनाची नवी आवृत्ती आली आहे हे समजायचाच अवकाश , तपस्वींनी  प्रकाशकाची चिंता न करता मराठी तजुर्मा केव्हाच  हातावेगळा करून टाकला असता..      काश्मीरची समस्या चिघळवत ठेवण्यास जसा पाकिस्तानला विशेष इंटरेस्ट आहे , तसच ते राज्य आणि तिथले  राजकारण सातत्याने धुमसते  ठेवण्यात शेख  घराण्याला विशेष रस आहे... काश्मीरची सत्ता निरंकुशपणे  शेख घराण्याच्या हाती रहावी  यासाठी सिद्धान्तहीन राजकारणाचे  प्रयोग या घराण्याने गेली ६५ वर्षे काश्मिरात केले आहेत . नेहरू-गांधी घराण्याच्या हाती देशाची राजवट दीर्घकाळ होती, जम्मू- काश्मिरातील सरकारे  तर निव्वळ त्यांच्याच मार्गदर्शनाखाली कार्यरत होती , पण पाकिस्तानने  जसा योजून काश्मीरचा विषय आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर उकळता ठेवला, तसा तो ठेवणे  किंवा  जगाची-मतांची-पुन्हा सत्तेत येण्या-न येण्याची फारशी पर्वा न करता भारत सरकराने  तो हाताळावायासाठी जनमताचा रेटा भारत सरकारच्या पाठीवर राहिला असता तर जगमोहनना धुमसत्या बर्फाची रक्तरंजित कहाणी लिहावी लागली नसती...गेल्या ६५ वर्षातल केंद्र सरकारचे  नियोजन चुकत गेले  म्हणूनच काश्मीरचे  भूत आपल्या डोक्यावर कायमच बसलं, बांगलादेशाला स्वातंत्र मिळवून देऊनही  बांगला निर्वासितांचा प्रश्न कायम राहिला, अल्पसंख्याकांच्या मतांच्या आधारावर निवडणुका जिंकून सत्तेत राहता येत हे गणित समजल्यामुळे त्याचं  अकारण लांगुलचालन  करण्याचे सत्ताधाऱ्यांचे बेशरम प्रयोग वाढत राहिले , त्याच मानसिकेतून अयोध्येतला राममंदिराचा प्रश्न चिघळता राहिला, त्याच पराभूत मानसिकेतून गोध्रा हत्याकांड घडूनही हिंदूच आरोपीच्या पिंजऱ्यात कायम राहिले, आणि पूर्वांचलला उर्वरित भारतापासून तोडणारी चिंचोळी भूपट्टी ताब्यात घेण्यासाठी बांगलादेशी घुसखोरांकरवी   मूलनिवासिंना देशोधडीला लागावे लागले.. २६ नोव्हेंबर २००८ सालचा मुंबई शहरावरचा हल्ला त्यातूनच घडला,रझा अकादमीचा मोर्चा त्याच्याच परिणामी घडला आणि आगे देखो क्या क्या होता है  ची आरोळीही त्यातूनच उमटली..सुप्त झालेलं भारतीय मानस जागे करण्याच्याच प्रयत्नाचा एक भाग म्हणजे जगमोहन याचं हे लेखन...

click why do women cheat on husbands why women cheat with married men
sex disease parentpower.com std chlamydia pictures
types of women who cheat crossbordercapital.com women cheat on their husbands
i dreamt my boyfriend cheated on me click my boyfriend thinks i cheated on him
Login Form
 
Username:
Password: