Welcome, Guest |  Login  | 

Welcome to Moraya Prakashan Online Store


प्रकाशक : मोरया प्रकाशन

 
Our Price: Rs:100.00

Minimum order size is Rs. 200. Orders less than Rs. 200 will not be processed online.
Generally delivered in 6- 8 business days.

श्रीसमर्थांचा गाथा  

माझी काया आणि वाणी,गेली म्हणाल अंत:करणी,परी मी आहे जगत्जीवनी निरंतर ।।
नका करू खटपट ,पहा माझा ग्रंथ नीट ,तेणे सायुज्यतेची वाट गवसेल की ।।
सदगुरू समर्थ रामदासांच्या उपदेशानुसार त्यांच्या सर्वसमावेशक अशा अफाट  वाङ्मयसंपदेत मानवी जीवनातील परमोच्च ध्येयाच्या प्राप्तीसाठीचा मार्ग सापडतो .इंग्रजी सत्तेच्या कठीण कालखंडातही समर्थहृदय कै. शंकर श्रीकृष्ण देव ,कै.ल. रा .पांगारकर आणि प.पू. कै.अनंतदास रामदासी महाराज या तीन महापुरुषांनी समर्थ संप्रदायाच्या प्रचारासाठी फार मोठे वाङ्मयीन योगदान दिले . प्रत्येक समर्थ भक्ताच्या अंत:करणात या तिघांबद्दल आदर आणि कृतज्ञता आहे . तिघांनी समर्थांचे विस्तृत चरित्रग्रंथ तयार केलेच पण त्याच बरोबर समर्थांच्या कवितासमुद्रात मानस नौकेने यथेच्छ विहार केला . श्रीमत् ग्रंथराज दासबोधाचा अभ्यास सुलभतेने करता यावा म्हणून अनंतदास महाराजांनी 'दासबोध प्रवेश' हा ग्रंथ साकारला . विद्यार्थ्यांकरिता व्यक्तिमत्व विकास साधला जाईल असे निवडक वेचे संपादित  केले . आणि सर्वात महत्वाचे म्हणजे  ग्रंथराज दासबोध , आत्माराम या व्यतिरिक्त असणारी, सर्वत्र विखुरलेली समर्थांची स्फुट कविता समग्र' गाथा' या  स्वरुपात संपादित केली .समर्थांचा गाथा ची पहिली आवृत्ती १९२८ साली प्रकाशित करण्यात आली होती . 
महाराष्ट्र धर्म राहिला काही , तुम्हांकारणे ।।श्री छत्रपती शिवरायांना उद्देशून लिहिलेल्या या ओळी . वेळोवेळी समर्थ रामदासांची  ही स्फूर्तीदायी वाणी श्री शिवरायांच्या धर्मसंस्थापनेच्या कार्यात सहाय्यभूत ठरली.समर्थांच्या वाङ्मयात'महाराष्ट्र धर्माच्या' मूलभूत  तत्त्वांची शिकवण आहे. कोणत्याही कालखंडात पडत्या, आडमार्गाला लागलेल्या राष्ट्राला योग्य मार्गावर आणून सोडण्याचे सामर्थ्य त्यात आहे .
 लोकसेवा म्हणजेच परमेश्वर सेवा  होय हा विचार सातत्याने मांडणारे हे साहित्य आजच्या परिस्थितीत वाचले जाण्याची नितांत गरज आहे . याचा अभ्यास करणाऱ्यांमध्ये धैर्य,उत्साह,स्फूर्ती ,कार्यप्रवणता उत्पन्न करण्याची विलक्षण जादू यात आहे .
.

लेखक : प.पू.अनंतदास रामदासी   

NA

अंतरंग

समर्थ रामदास स्वामींचे साहित्य प्रापंचिक व्यवहार ,सदाचार ,आध्यात्मिक मार्गदर्शन ,राजनीती ,व्यक्तिमत्व विकास ,व्यवस्थापन शास्त्र व संघटन कौशल्य ,काव्य व तत्त्वज्ञान अशा विविध पैलूंनी नटलेले आहे . जीवनोपयोगी सर्वच विषयांचे अचूक आकलन ,सखोल चिंतन व नेमके मार्गदर्शन चपखल शब्दांत व्यक्त करणारे हे परिपूर्ण साहित्य आहे . या साहित्याच्या प्रत्येक ओळीतून भगवद भक्ती ,व्यावहारिक शहाणपण ,पुरुषार्थ व भव्य उत्कट आणि अचूक प्रयत्नवाद अनुभवता येतो .समर्थांचे काव्य,अभंग,पदे, आरत्या ,भारुडे  इत्यादी रचनांनी समृद्ध  अशा या गाथ्यातून  वाचकांना असाच एक विलक्षण आनंद अनुभवास येईल . प्रदीर्घ कालावधीनंतर उपलब्ध होणाऱ्या या ग्रंथात मूळ गाथेतील अभंगाबरोबरच   समर्थ रामदास स्वामींच्या काही अन्यत्र प्रकाशित अशा रचना  समाविष्ट केल्या आहेत. त्याचबरोबर कठीण शब्दांचे अर्थ, वर्णानुक्रमे पद्यसुची आणि विशेषार्थक टीपा यांच्या समावेशाने या गाथेला परिपूर्ण संदर्भ ग्रंथाचे अनमोल स्वरूप प्राप्त झाले आहे . 

Book details:

In Stock : Available
Pages : 640
ISBN No :
Binding : Hard
Weight : 1000 grams

Login Form
 
Username:
Password: