Welcome, Guest |  Login  | 

Welcome to Moraya Prakashan Online Store


प्रकाशक : मोरया प्रकाशन

 
Our Price: Rs:225.00

Minimum order size is Rs. 200. Orders less than Rs. 200 will not be processed online.
Generally delivered in 6- 8 business days.

श्रीमद्भागवत बोधकथामृत  

भावगतः भागवतः ।
असा भागवत या शब्दाचा एक अर्थ सांगतात. भागवत ग्रंथ भावात प्रविष्ठ आहे. तो भावमय आहे. भगवान श्रीकृष्णाचे रूप व स्वरूप एकच आहे. ही भागवताची भुमिका आहे . अवतारांची रूपे अनेक असली तरी ती प्रगट होऊन तिरोधान पावली असली तरी त्यातील स्वरूप एकच आहे. कलीयुगातील वैराग्य कमी होऊन लोलुपता वाढलेल्या स्थितीत निर्गुण ब्रम्हज्ञान होणे कठीण असल्याने , सगुणाचा बडिवार भागवतात सांगून सर्वांच्या उद्धाराची यात सोय केली. ग्रंथात अनेक ठिकाणी तक्ते दिल्याने विषय स्पष्ट करण्यास मदत झाली आहे. उदा. सृष्टीरचना, त्रिगुण, कालगणना, आत्मदर्शन, प्रधान प्रकृती यांच्या सुटसुटीत व्याख्या सांगून वाचकांना ते सुलभ केले अहे. प्रतिकात्मक कथांतील प्रतीके स्पष्ट केली असल्याने मुख्य गाभा कळण्यास मदत झाली अहे.
  सौ. अलकाताई  मुतालिक या महाराष्ट्र -डोंबिवली येथील असून त्या वेदान्त शास्त्राच्या अभ्यासक,प्रवचनकार, भागवतकथाकार आणि रामायणकथाकार  आहेत. त्या प. पू. डॉ. काका यांच्या अनुग्रहित आहेत. त्यांच्याच मुखातून अलकाताईनी वेदान्ताची प्रस्थानत्रयी म्हणजेच उपनिषदे,ब्रह्मसूत्र आणि भागवतगीता तसेच आद्य शंकराचार्यांचे ग्रंथ, तत्वज्ञान तसेच संतसाहित्य इत्यादी ग्रंथांवरील प्रवचने श्रवण व अध्ययन केली आहेत आणि त्यांच्याच आज्ञेने गेली २५ वर्षे प्रवचन सेवा करीत आहेत.  अलकाताईची प्रवचने अनेक देश-विदेशात झाली आहेत.

       

.

लेखक : अलका मुतालिक  

NA

अंतरंग

Book details:

In Stock : Available
Pages : 272
ISBN No :
Binding : Paper
Weight : 270 grams

Login Form
 
Username:
Password: