Welcome, Guest |  Login  | 

Welcome to Moraya Prakashan Online Store


प्रकाशक : मोरया प्रकाशन

 
Our Price: Rs:170.00

Minimum order size is Rs. 200. Orders less than Rs. 200 will not be processed online.
Generally delivered in 6- 8 business days.

रक्तलांच्छन  

'रक्तलांच्छन' हे डॉ.सच्चिदानंद शेवडे यांचो प्रकाशित झालेले पहिले पुस्तक. फाळणीची रक्तकहाणी लोकांपर्यंत जावी या उद्देशाने लिहिलेली ऐतिहासिक विषयावरील कादंबरी..आज डॉ.सच्चिदानंद शेवडे हे आपल्या वाणीने  आणि लेखणीने ओजस्वी भाषेत हिंदुत्वाचा पुरस्कार करणारे लेखक - प्रवचनकार म्हणून सुप्रसिद्ध आहेत.भारताची फाळणी आणि त्यामुळे वाट्याला आलेले भोग ,तो इतिहास  'रक्तलांच्छन' मधे सडेतोडपणे मांडला आहे.खरा इतिहास लोकांपर्यंत पोचण्यासाठी अशा प्रकारच्या अनेक विषयांवरील पुस्तकांची आवश्यकता आहे.   या विषयाला प्रस्तावना तशाच वजनदार नेत्याची आवश्यक होती आणि शिवसेनाप्रमुख मा.बाळासाहेबांखेरीज दुसरे नाव समोर येणेच शक्य नव्हते..त्यातून साहेब प्रस्तावना देत नसत, त्यांच्याकडून प्रस्तावना मिळवण्याची सुद्धा एक रोचक गोष्ट आहे...ती या नव्या आवृत्तीत रविप्रकाश कुलकर्णी यांनी शब्दबद्ध केली आहे.फाळणीचा प्रश्न आजसुद्धा अवघड जागेवरच्या दुखण्यासारखा होऊन बसला आहे, हे काश्मीर-कारगिल येथील नित्य चालणारी घुसखोरी, अतिरेकी कारवाया आणि चट्टीसिंगपुरा-दोडा-नंदिमार्ग आदी ठिकाणच्या हिंदूंच्या होणाऱ्या नृशंस हत्याकांडातून सातत्याने जाणवते आहे.डॉ.सच्चिदानंद शेवडे यांनी 2003 मधे जम्मू-काश्मीरचा, वीस दिवसांचा अभ्यासदौरा केला. त्यावेळी आलेले अनेक  अनुभव मन बधीर करून टाकणारे होते. डॉ.सच्चिदानंद शेवडे आपल्या मनोगतात म्हणतात, पुरोगामी लोकांचा याकडे पाहण्याचा दृष्टीकोन बुचकळ्यात टाकणारा आहे. त्यांचे पुरोगामित्व कसे ‘सिलेक्टिव्ह’ असते ते सामान्य जनतेला कळून चुकले आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा टेंभा मिरविणारे जेएनयू मध्ये देशविरोधी घोषणा दिल्या गेल्या तरी समर्थनार्थ उभे राहतात. पण एका दैनिकाचे कार्यालय केवळ चित्रावरून फोडले जाते तेव्हा शेपूट घालून गप्प बसतात. त्या लेखातून जो आतंकवादाविरुद्ध संदेश दिला गेला तो या गडबडीत कोणापर्यंत पोहचतदेखील नाही. फाळणीनंतर हा देश हिंदूंना न विचारता तत्कालीन नेत्यांनी सर्वधर्मीय म्हणून जाहीर केला. तो तत्कालीन हिंदूंनी मान्य केला हे त्यांचे उपकार आहेत. ब्रिटीशांचा जसा ब्रिटन, फ्रेंचांचा फ्रान्स, जर्मनांचा जर्मनी तसाच हिंदूंचा हिंदुस्थान असे ठणकावून सांगणारा नेता ही सांप्रतची गरज बनली आहे. याचा अर्थ अन्य अल्पसंख्याकांनी येथील बहुसंख्याकांचा योग्य तो आदर राखून रहावे असा आहे. त्यांनी येथून चालते व्हावे असे अजिबात अपेक्षित नाही.आजही मतांच्या लाचारीपायी देशासाठी घातक कृत्ये का केली जात आहेत याचा जाब आपणासारख्या नागरिकांनी विचारायला हवा.  बलशाली राष्ट्राच्या निर्मितीसाठी ते आवश्यक आहे..

लेखक : डॉ.सच्चिदानंद शेवडे  

डॉ.सच्चिदानंद शेवडे is marathi author

अंतरंग

Book details:

In Stock : Available
Pages : 250
ISBN No :
Binding : Paper
Weight : 250 grams

Login Form
 
Username:
Password: