Welcome, Guest |  Login  | 

Welcome to Moraya Prakashan Online Store

Book Review Details

small grey bullet

 

 वैष्णोदेवीचा कृतिशील भक्त

 

      जगमोहन यांनी Reforming Vaishno Devi and a case for Reformed, Reawakened and Enlightened Hinduism या नांवाचा एक ग्रंथ लिहिला आहे.  या ग्रंथाचा भावानुवाद डॉ. सच्चिदानंद शेवडे यांनी केला आहे.  तो ग्रंथ “ मिशन वैष्णोदेवी – संघर्ष आणि उत्कर्ष ”  ह्या मथळ्याचा आहे.  मोरया प्रकाशनाने प्रसिद्ध केलेला हा ग्रंथ मूळ इंग्रजी ग्रंथाइतकाच उत्कृष्ट झाला आहे. 

   डॉ. शेवडे यांनी त्याला भावानुवाद म्हटले ते योग्य आहे.  मूळ लेखकाचा नेमका भाव जाणूनच दुस-या भाषेतला मजकूर आपल्या भाषेत उतरवायचा असतो.  हे तसे कठीण काम आहे.  स्वतंत्र ग्रंथ लिहिणे आणि एखाद्या ग्रंथाचा भावानुवाद करणे ह्यात मोठा फरक आहे.  भावानुवाद करण्यासाठी अनुवादकाला मूळ लेखकाच्या भावनिक, मानसिक पातळीचा अंदाज घ्यावा लागतो.  त्यासाठी स्वतः सूक्ष्म रुपात जाऊन त्या लेखकाच्या भावनेशी, भावावस्थेशी  समरस व्हावे लागते.  तरच भावानुवाद अचूक आणि मूळ ग्रंथाच्या आत्म्याला धक्का न लावणारा होतो.  ह्या कामात डॉ. शेवडे पूर्ण यशस्वी झालेले आहेत.

 मुळात जम्मू-कश्मीरचे माजी राज्यपाल जगमोहन हे संवेदनशील मनाचे आहेत.  आपला देश, आपला धर्म, आपला अध्यात्मिक वारसा यावर त्यांची अटळ, अढ़ळ श्रद्धा आहे.  आपल्या तीर्थ क्षेत्रांचे पावित्र्य नष्ट होऊ नये, त्यातील ईश शक्ती सर्वांना अनुभवताही आली पाहिजे त्यासाठी तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी होणारी अयोग्य कृत्ये, बेशिस्त, भ्रष्टाचार यांना हद्दपार केले तरच तिथल्या स्पंदनांची अनुभूती येईल.  यात्रेकरुंसाठी योग्य ती व्यवस्था असणे महत्वाचे.  ती स्वच्छ, टापटीप आणि प्रसन्न वातावरणाने नटलेली मंदिरे सर्व देशात असावीत.  त्यासाठी वैष्णोदेवीच्या मंदिराचा कायापालट करून त्यांनी एक आदर्श निर्माण केला.  जगमोहन यांच्या या भावनेला जाणून केलेला भावानुवाद असल्याने आपण त्यात रंगून जातो.  ती अनुभूती सहजतेने घेऊ शकतो.

 आज आपल्या धर्माला नष्ट करण्याचा चारही बाजूने प्रयत्न चालू आहे.  स्त्री, गाय, वेद आणि ब्राम्हण हे हिंदू धर्माचे चार आधारस्तंभ आहेत.  त्यांना विकलांग करण्याचा प्रयत्न चालू आहे.  याच पार्श्वभूमीवर जगमोहन यांनी पुरुषसूक्ताचे महत्व, स्त्रीचे हिंदू धर्मातील स्थान याबाबतची माहिती आपल्या ह्या ग्रंथात दिली आहे.  ती वाचकांनी शरीराचे डोळे करून वाचली पाहिजे. 

  त्यांनी भारतमाता, भूमाता आणि देवीमातेला स्मरून काम केले.  ते काम करताना घटनेतल्या 25 आणि 26 कलमांचा कोणत्याही प्रकारे भंग न करता त्यांच्या मर्यादेत राहून वैष्णोदेवीच्या मंदिराचा आणि त्या सभोवतालचा कायापालट केला.  त्यांच्या या ग्रंथात अध्यात्म, व्यवहार आणि भक्तीचा त्रिवेणी संगम दिसतो म्हणूनच त्यांच्या हातून देवीची सेवा घडली.

  वैष्णोदेवी ज्या गुहेत आहे तिथे महाकाली, महासरस्वती आणि महालक्ष्मी ही आदिशक्तीची तीन रूपे आहेत.  निर्मिती, पालन, लय आणि पुनर्निर्माण करणारी महाकाली.  ती वाईट गोष्टींचा नाश करते.  उत्तम गोष्टींची निर्मिती करून त्यांचे पालन करते आणि काळाच्या ओघात काही चांगल्या गोष्टी नष्ट झाल्या तर त्यांची पुनः निर्मिती करते.  महासरस्वती आपल्याला प्रज्ञा, बुद्धी, विद्या आणि विवेकाचे दान देते.  तर महालक्ष्मी शांती देते.  त्या शांतीमुळेच प्रगती होते.  ती प्रगती समृद्धतेकडे नेते आणि संपत्ती ही प्राप्त होते.  ह्या तीनही मातांची ही सारी वैशिष्ट्ये आपण आत्मसात करून आपल्या जीवनाचा विकास साधायचा आहे.  ह्या वैशिष्ट्यांपैकी वा गुणांपैकी एक जरी गुण आपल्यात नसेल तर आपली पारमार्थिक अथवा प्रापंचिक क्षेत्रातील प्रगती, विकास खुंटून जाईल.  असे जगमोहन यांना खात्रीपूर्वक वाटते.  म्हणून त्यांनी त्यांचा पुरस्कार केला आहे.  या ग्रंथाचे वाचन करताना वाचकाने तो संथपणे वाचावा.  दोन ओळींमधला अर्थ जाणून घेण्याचा प्रयत्न करावा तरच त्यातील विषयाचा आशय सहज ध्यानात येईल.  अनेक ठिकाणी कठिण विषय सुद्धा सहजतेने सांगून त्याला खडीसाखरेप्रमाणे गोडी आणण्याचा प्रयत्न जगमोहन यांनी केला आहे.  त्याला डॉ. शेवड्यांनी योग्य तो न्याय दिला.  (भावानुवाद करताना)  म्हणून त्यांचे कौतुक केले पाहिजे.

 वाचकाला आपले अध्यात्मशास्त्र, वेद, उपनिषदे  यांचा अभिमान वाटावा, त्यांचा अभ्यास करण्यास वाचक उद्युक्त व्हावा म्हणून पाश्चात्य तत्ववेत्त्यांची त्या विषयीची मते त्यांनी दिली आहेतच त्याचबरोबर महात्मा गांधी, डॉ. राधाकृष्णन, स्वामी विवेकानंद, योगी अरविंद अशा भारतीय महानुभावांची वचनेही उधृत करून आपल्या विचारांचा, मतांचा पाया भक्कम केला आहे.

 देवीच्या दर्शनाला गेल्यानंतर जगमोहन यांना तिच्या दर्शनाने आलेला अनुभव सांगताना ते म्हणतात, मी सूक्ष्म अणूहूनही सूक्ष्म आहेतरीही विशालाहून विशाल आहे. ”  त्यांना आलेली ही अनुभूती आणि तुकाराम महाराजांनी, अणुहुनिया तोकडा, तुका आकाशाएवढा  असा अभंग लिहून ती अनुभूती व्यक्त केली आहे.  जगमोहन यांना हा अभंग माहीत असण्याची सुतराम शक्यता नाही.  पण ते तुकाराम महाराजांप्रमाणे त्या विवक्षित भावावस्थेपर्यंत पोहोचले होते.  याची साक्ष त्यांचे वरील वचन देते.

 हा ग्रंथ वाचकाला कार्य करण्यास प्रवृत्त करेल.  ज्ञानाची लालसा आणि बह्मतेजाची ओढ निर्माण झाल्याखेरीज कोणत्या देवतेच्या शक्तीची अनुभूती येत नाही , असा संदेश हा ग्रंथ वाचकाला देतो.  त्यासाठी फक्त वाचकाने तन्मयतेने तो वाचायला हवा.

 मोरया प्रकाशनच्या श्री दिलीप महाजनांनी अत्यंत महत्वाचा ग्रंथ मराठी भाषेत मराठी वाचकाला उपलब्ध करून दिला त्या बद्दल त्यांचेही मनःपूर्वक अभिनंदन केले पाहिजे.  232 पृष्ठांचा हा ग्रंथ वाचकाने ज्ञान भक्तीचा आणि कार्यलालसेचा ठेवा म्हणून आपल्या संग्रही ठेवला पाहिजे आणि तरुणांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त भेट म्हणून दिला पाहिजे.  वाचक या ग्रंथाचे यथोचित स्वागत करतील असा विश्वास वाटतो.  (या ग्रंथाचे मूल्य केवळ 200/- रु. आहे.)

 

 

दुर्गेश जयवंत परुळकर

9224921127what to do when husband cheats read why women cheat
list of all std where to get std testing for free chlamydia on men
aids symptoms in men site hiv transmission facts
why do women cheat on their husbands scottdangelo.com types of women who cheat
abortion doctors go abortion law
where to do abortion abortion clinics in cincinnati abortions in houston
wife cheat story seniorgeekpc.com looking for affair
why do i cheat on my husband site my husband cheats
Login Form
 
Username:
Password: