तेजोनिधी सावरकर
हिंदुत्व सोडून इंद्रपद जरी मिळत असेल तरी पहिला हिंदुत्वद्रोही होऊन इंद्रपदी विराजमान होण्यापेक्षा
अखेरचा हिंदुत्वनिष्ठ म्हणून लढता-लढता मरण पत्करणे योग्य ठरेल.-स्वातंत्र्यवीर सावरकर
दासबोध चिंतनसार
वाचकांना दासबोधाच्या आधिक अभ्यासाकडे आपोआप प्रवृत्त करणारा असा सोपा व सुटसुटीत ग्रंथ !!
सुभाष बावनी – नेताजी सुभाषचंद्र बोस यांची ललित क्रांतिकथा
काश्मीर : धुमसते बर्फ
हा काश्मीरचे भूतपूर्व राज्यपाल ,माजी सनदी अधिकारी व माजी केंद्रीय मंत्री श्री. जगमोहन यांच्या मूळ My Frozen Turbulence in Kashmir या इंग्रजी ग्रंथाचा मराठी अनुवाद. हा अतिशय वेधक ग्रंथ, इतिहासाचा वेध घेत, ते जम्मू काश्मीर सारख्या अत्यंत संवेदनशील राज्याचे दोनदा राज्यपाल असताना घडलेल्या घटनांचं सखोल विश्लेषण सादर करतो आणि सांगतो काश्मीर हे अत्यंत खडतर आव्हान फक्त सुधारीत आणि परिष्कृत भारतच पेलू शकेल, असा भारत की ज्याच्यापाशी ‘उद्या’ चा वेध घेणारी दृष्टी आहे व वास्तवाचं भान ठेवून व्याहारिक उपाय योजण्याची जिद्द आहे.
नर्मदा परिक्रमा:एक आनंदयात्रा
नर्मदा मैयाच्या असीमकृपेने तीनदा पायी परिक्रमा करणारे नर्मदा मैयाचे परमभक्त
श्री. उदयन् आचार्य यांच्या अनुभवकथनाने साकार झालेला रसाळ ग्रंथ!!
पाकिस्तान विनाशाकडून…. विनाशाकडे
इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तान ,नावाने ओळखल्या जाणाऱ्या या देशाचा संक्षिप्त इतिहास, वर्तमान आणि भविष्याची अभ्यासपूर्ण चिकित्सा प्रस्तुत पुस्तकात केली आहे.
मनाच्या श्लोकातून मन:शांती
या ग्रंथाला ‘मनाच्या श्र्लोकातून मनःशांती’ हे नाव केवळ आकर्षक म्हणून दिलेले नाही. अशांत मन ही वर्तमान युगाची ज्वलंत समस्या आहे. या सर्व चिंता अशांत मनाची निर्मिती आहे. मन जर शांत झाले तर हे सर्व प्रश्न निश्चित सुटतील आणि अशांत मन शांत करण्याचे पूर्ण सामर्थ्य मनाच्या २०५ श्र्लोकात आहे.
श्री दासायन
श्री अनंतदास कट्टर समर्थ सांप्रदायिक होते ,पण अंधश्रद्ध व भोळेभाबडे नव्हते .समर्थ वाङ्मयाचे ते गाढे अभ्यासक होते.त्यांनी सुमारे हजारपानी समर्थ चरित्र तीन खंडात लिहून काढले.हे तीनही खंड अनेक वर्षे उपलब्ध नव्हते. माझे मित्र श्री.दिलीप महाजन या तीनही खंडांचे एकत्रीकरण करून हा अद्भूत ग्रंथ प्रसिद्ध केला आहे.एका अर्थाने हा ग्रंथ समर्थ संप्रदायाचा ज्ञानकोषच आहे.रामायणावरून दासायन हा शब्द तयार केला असल्यामुळे रामायणाप्रमाणे सप्तकांडात्मक असे हे चरित्र आहे.-सुनील चिंचोलकर
समर्थ रामदासांचे व्यवस्थापन
समर्थांच्या व्यवस्थापनावर तांबेकर यांनी इंग्रजीत मोठा ग्रंथ लिहिला आहे.
समर्थ समकालीन कागदपत्रांतून घडणारे रामदास दर्शन
सतराव्या शतकाच्या पूर्वार्धातच महाराष्ट्राला एक सुंदर स्वप्नं पडलं.
सरदार वल्लभभाई पटेल
स्वातंत्र्योत्तर एकात्मिक भारताचे शिल्पकार म्हणून अतुलनीय कामगीरी करणा-या सरदार वल्लभभाई पटेलांची जीवनगाथा उलगडणारा ग्रंथ !
कठोर,कणखर, लोहपुरुष, दृढनिश्चयी सरदारांचे देशहितास वाहिलेले जीवन म्हणजे त्या काळचा इतिहास, सत्य आणि तथ्य, संदर्भासहित मांडणारा ललित लेखनाच्या शैलीतील ग्रंथ !