उपक्रमशील आणि साहस यांचे मूर्तिमंत प्रतिक म्हणजे जे.आर.डी.टाटा. असंख्य तरुणांना त्यांनी कार्याची प्रेरणा दिली. देशाच्या समर्पणशील सेवेचे लखलखते उदाहरण म्हणजे जे.आर.डी.टाटा. गेले अर्धशतक जे.आर.डी.टाटा यांच्याकडे भविष्यकाळाचा वेध घेणारे दृष्टे म्हणून पहिले जात आहे. त्याबद्दल कधी त्यांचा परदेशांत जयजयकार झाला तर बऱ्याच वेळा भारतात मात्र उपेक्षाच वाट्याला आली. हे संपूर्ण भारतीय उपखंड दुर्धर दारिद्र्याच्या खाईतून वर काढून त्याला संपन्नतेच्या वैभवशाली कालखंडात नेण्यासाठी ज्या अल्पस्वल्प भारतीयांनी अथक परिश्रम केले, त्यापैकी जे.आर.डी.टाटा हे एक मानकरी आहेत. १९८३ च्या जानेवारीमध्ये रोटरी इंटरनॅशनलने जे.आर.डी.टाटा यांना पारितोषिक दिले त्यामधील उतारा…. “भारत हे एक बलाढ्य राष्ट्र होण्यापेक्षा ते एक सुखी राष्ट्र झालेले पाहण्यांत मला जास्त आनंद आहे.”” जे.आर.डी.टाटा टाटा उद्योग समूहाचे जे बोधचिन्ह आहे त्याचे शिल्पकार जमशेटजी टाटा. ह्या बोधचिन्हावर लिहिले आहे. “शुभविचार-शुभवचन-शुभकार्य”
Reviews
There are no reviews yet.