ज्ञानेश्वर, रामदास, विवेकानंद, सावरकर या अलौकिक महापुरुषांच्या जीवनावरील रवींद्र भट यांच्या ललित कादंबऱ्या मराठी साहित्यात लक्षणीय ठरल्या आहेत. या महापुरुषांचे जीवनदर्शन आपल्या उगवत्या पिढीसमोर ठेवावेत या उद्देशाने खास बाल-कुमारांसाठी श्री. रविंद्र भट यांनी प्रस्तुत संस्कारमाला शब्दबध्द केली आहे. ज्ञानेश्वरांचा माणूसधर्म ,समर्थ रामदासांची राष्ट्रनिष्ठा, विवेकानंदांचा विश्वबंधुत्व विचार आणि सावरकरांची धगधगती देशप्रीती नव्या पिढीच्या मनी रुजायला हवी म्हणून शिक्षकांनी/पालकांनी संस्कारमालेतील गोष्टीरूप चरित्रे वाचावीत व मुलांकडून जाणीवपूर्वक वाचून घ्यावीत.एक आदर्श माणूस घडविण्याच्या प्रक्रियेला अपोआप गती लाभेल.
Reviews
There are no reviews yet.