सातत्याने काम करण्याची जिद्द ,उदंड उत्साह,अन प्रखर बुद्धिमत्तेचे वरदान असे देवदुर्लभ गुण लाभलेल्या काही व्यक्ती समाजामध्ये वावरत असतात .अशांपैकी काही व्यक्तींना जनहिताची आत्यंतिक तळमळ लागलेली असते .अशा व्यक्ती वैयक्तिक सुख समाधानाचा जराही विचार न करता जन कल्याणासाठी तन-मन-धनाने स्वत:ला सामाजिक कार्यात झोकून देतात.स्वीकृत कार्यालाच परमेश्वर मानून त्याच्या उपासनेत ते गढून जातात. हळू हळू त्यांचा कार्यसुगंध आसमंतात पसरायला लागतो.समाजाला त्यांच्या लोकोत्तर कार्याची जाणीव होते-महती पटते .अशा व्यक्तीचा,त्याच्या कार्याचा यथोचित गौरव व्हावा अशी विचारधारा समाजमनामध्ये निर्माण होते .अशा लोकोत्तर कार्यासाठी तेवढ्याच तोलामोलाचा गौरव हवा.तो कोणता तर जगमान्य सर्वोच्च गौरव ‘नोबेल पारितोषिक’ होय.असा गौरव मिळवणारे हे भारतमातेचे सुपुत्र!
Reviews
There are no reviews yet.