श्री समर्थ रामदास स्वामी कृत छत्रपती शिवाजी महाराजांवरील स्तुतीपर काव्याचे विवेचन करणाऱ्या ‘धर्मरक्षी ऐसा नाही’ या ज्येष्ठ इतिहास अभ्यासक आणि लेखक प्रा. सचिन कानिटकर यांनी लिहिलेल्या पुस्तकाचे नुकतेच नाशिक येथे प्रकाशन झाले . ‘निश्चयाचा महामेरू ‘या काव्यामध्ये समर्थ रामदास स्वामींनी अनेक उत्तमोत्तम विशेषणांची मालिका वापरून छत्रपती शिवाजी महाराजांचे गुणवर्णन केले आहे . शिवरायांचे अलौकिक गुण त्यांच्या जीवनातील अनेक कसोटीच्या प्रसंगी उठावदारपणे आपल्या समोर येतात .छत्रपती शिवरायांचे जीवनही अलौकिक आणि ते यथार्थपणे काव्य रुपात उमटवणारे समर्थांचे शब्दही तितकेच प्रभावी.समर्थांच्या या काव्यावर आजवर अनेक कलाकृती निर्माण झाल्या आणि गाजल्या .परंतु आजपर्यंत या काव्याचे कडव्यानुरूप आणि प्रत्येक शब्दानुरूप विवेचन करणारे पुस्तक असे नव्हते . याची उणीव मोरया प्रकाशनाच्या या पुस्तकाने भरून काढली आहे. आजच्या युवकांसाठी हे पुस्तक खूपच प्रेरणादायी ठरेल . समर्थव्रती सुनील चिंचोलकर या पुस्तकाबद्दल म्हणतात , ” शिवछत्रपतींचा गुणगौरव करणारी अनेक कवने झाली . पण समर्थ रामदासांनी जेवढ्या प्रभावी शब्दात शिवरायांचे वर्णन केले तेवढ्या प्रभावीपणे कुणीही वर्णन करू शकले नाही ” असे महाराष्ट्राचे व्यासंगी मुख्यमंत्री कै. यशवंतराव चव्हाण म्हणतात. शिवरायांची स्तुती करताना समर्थांनी जी विविध विशेषणे वापरली त्या द्वारे श्री शिवरायांचा तेजोमय जीवनप्रवास प्रा. सचिन कानिटकर यांनी या पुस्तकात आपणा सर्वांना घडवला आहे . त्यामुळे समर्थ शिवचरित्राचे कसे समकालीन अभिमानी होते ते ध्यानात येते . शिवचरित्राकडे पाहण्याची शुद्ध व पवित्र दृष्टी समर्थांचे हे काव्य आपल्याला देते . या काव्याला प्रा.सचिन कानिटकर यांनी न्याय दिला आहे . शिवचरित्र चिंतनाचे एक नवीन द्वार त्यामुळे खुले झाले .
Reviews
There are no reviews yet.