Look Inside

सरदार वल्लभभाई पटेल

(1 customer review)

स्वातंत्र्योत्तर एकात्मिक भारताचे शिल्पकार म्हणून अतुलनीय कामगीरी करणा-या सरदार वल्लभभाई पटेलांची जीवनगाथा उलगडणारा ग्रंथ !

कठोर,कणखर, लोहपुरुष, दृढनिश्चयी सरदारांचे देशहितास वाहिलेले जीवन म्हणजे त्या काळचा इतिहास, सत्य आणि तथ्य, संदर्भासहित  मांडणारा ललित लेखनाच्या शैलीतील ग्रंथ !

450.00

Browse Wishlist
Categories: , ,
खरे तर मला कादंबरीत व्यक्त होणे आवडते. पण सरदार वल्लभभाईंचे विराट व्यक्तिमत्व कादंबरीच्या आकृती बंधात बसवणे पटेना. कठोर,कणखर, लोहपुरुष, दृढनिश्चयी सरदारांचे
 देशहितास वाहिलेले  जीवन म्हणजे त्या काळचा इतिहास!  पण मला ही निर्मिती इतिहासात अडकलेली  सनावळी होणेही नको होती. म्हणून सुरूवातीस सरदार स्वातंत्र्यसंग्रामात उतरले तत्पूर्वीच्या त्यांच्या कष्टमय जीवनाचे दर्शन पहिल्या भागात, गांधीजी आणि नेहरु हे दोघेही बॅरिस्टर होते. त्यांची राजकीय कारकीर्द झळझळीत असली तरी ते वकीलीत गाजले नव्हते. पण बॅरिस्टर वल्लभभाईं पटेलांची ही कारकीर्दही यशाची परिसीमा होती.वल्लभभाईंच्या या जीवनातील निवडक घटना आणि  कोर्टात  गाजवलेल्या पराक्रमाचे निवडक किस्से दुसऱ्या भागात नमूद करणे आवश्यक वाटले.
 राजपुरुष सरदार पटेलांची कारकिर्द विशाल! समांतर घडणाऱ्या घटनातही एकावेळी अनेक समस्या ते कौशल्याने हाताळत. त्या घटना महत्वाच्या घडामोडी या सदरात सविस्तर मांडल्या आहेत. गांधी, सरदार आणि नेहरू मतभेदांचा तटस्थ आढावा घेत दिग्गजांच्या दृष्टीकोनातून सरदारदर्शन घडवण्याचा प्रयत्न केला आहे. या कशातही सामावू न शकलेले महत्वाचे घटित परिशिष्टात समाविष्ट केले आहेत कारण ललित लेखनाच्या शैलीतील असले तरी हे लिखाण आहे आपला इतिहास! म्हणून
 सत्य आणि तथ्य दोन्हीचा तौलनिक विचार करून, शक्य तितके संदर्भ तपासून, तटस्थपणे मिळवलेली माहिती सादर करणे मला आवडते तितकेच कर्तव्यही वाटते. त्याच दृष्टीकोनातून या ग्रंथाची मांडणी केली आहे.
                 तान्हेपणी मला  सरदारांचा आशीर्वाद लाभला होताच. आता जवळपास त्यांच्या वयाची होत असताना मला या लोहपुरुषास मनोमन वंदन करून आशीर्वाद मागावासा वाटला. तशी आशीर्वादासाठी याचना करून मी कलम परजली. त्याचे हे फलीत!
स्मिता भागवत

1 review for सरदार वल्लभभाई पटेल

  1. Anant Gautam

    Magnificent Book on SARDAR VALLABHBHAI PATEL is another precious crown to Moraya Prakashan! I think this is the only book in Marathi which gives great insights of Sardar Patel to common man, which is very very important.
    I wish this book needs to be translated in all the Indian languages!!
    I have gifted this book to many of my friends as well.
    i had attended publication programme of this book b’coz of Gauri Mahajan Deo & there only I baught the book.
    In general, we do not know much about Sardar Patel except him as a Loh Purush ! why he was called so, if it’s questioned, then…. except one or two incident of Sardar’s life, i believe hardly few people will be knowing…. Till I read your book, I was also the part of this crowd!
    Why Sardar Patel was kept aside from the public eye, even after doing mammoth tasks in his lifetime for his beloved Nation??
    Whatever Gandhiji always tried to preach about his ideology, Sardar had given live practical of it! It was just outstanding & titanic performance, nobody could exhibit such thing, those who always used to say themselves as a true follower of Gandhiji !!
    His whole life was unmatched to contemporary Congresse Netas!
    In nut-shell, Sardar Patel was the Only GREAT LEADER in true sense, of pre-independence & Active Ruling Politics of post- independence times !!!
    To know all these things in detail, one needs to read this book….!
    And those who will start reading this book, won’t leave it before it finish….
    Thanks to it’s Author Smitaji Bhagwat & Moraya Publications Team for this great book ! I always look forward for such outstanding works!! 🙏🙏💐💐

Add a review

You may also like…