शबरीपुत्र

वनवासी क्षेत्रात चाळीस वर्षे सक्रीय असलेल्या कार्यकर्त्याचे प्रेरक आत्मकथन..

400.00

Out of stock

Categories: ,

सातपुड्याच्या डोंगरदऱ्यात फिरताना त्यापल्याडच्या नर्मदामैयाचं दर्शन घेण्याचं भाग्य बऱ्याच वेळा मला लाभलं. नर्मदेच्या पाण्यात पाय सोडून निवांत बसलो असताना मात्र मला आठवत होता तो परमपूजनीय श्री गुरुजींनी अथांग प्रेमातून आशीर्वादासाठी डोक्यावर ठेवलेला हात आणि अवघं आठ-दहा फुटांवरून घडलेलं आदरणीय विनोबाजींचं दर्शन..
तो योग येणं यात माझं कर्तृत्व काहीच नव्हतं. ते तर पूर्वसंचिताचं देणं होतं..
भगवान गौतम बुद्धांना राजमहाल सोडल्यानंतर जसा अश्वत्थामा भेटला होता, तसाच तो सातपुड्याच्या डोंगरदऱ्यात फिरणाऱ्या नर्मदा परिक्रमावासियांनाही भेटतो म्हणतात..
अश्वत्थामा हे खरं तर भळभळत्या जखमांचं, विव्हळवणाऱ्या वेदनांचं, चिरत जाणाऱ्या दुःखाचं चिरंतन तत्व..
कपाळावरील भळभळत्या जखमेची वेदना कमी करण्यासाठी तेलाची याचना करत अश्वत्थामा फिरत असतो म्हणतात..
मला मात्र त्या अश्वत्थाम्याचं दर्शन घडलं ते ९०/९१ साली जव्हारमधील वावर वांगणी येथील बालमृत्यूच्या तांडवामध्ये, पुढे तेलंगवाडीतील क्षयाने अस्थिपंजर झालेल्या संगीताच्या भिजलेल्या डोळ्यांमध्ये आणि धडगावमधील कुपोषित बालकांच्या पहिल्या वैद्यकीय शिबिरात सहभागी झालेल्या त्या दोनशे बालकांच्या कण्हण्यामध्ये, रडण्यामध्ये..
तो आवाज दुसऱ्या कुणाचा नव्हताच, तो होता तेल मागत फिरणाऱ्या अश्वत्थाम्याचा आणि आत्मबळाच्या आधारावर अर्ध-पोषणावर मात करत “ प्रहृष्टम मे मनः ” म्हणणाऱ्या शबरीमातेचा..
बुद्धानं आणि शबरीनं अनुभवलेली मानवजातीची ती सनातन वेदनाच समजून घेत घेत सुरु आहे माझा हा प्रवास..

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “शबरीपुत्र”