Regular
अलौकिक गुरुशिष्य
प्रस्तुत पुस्तकात अलौकिक गुरु-शिष्यांच्या बोधप्रद गोष्टी सादर केल्या आहेत.
Books
राममंदिर अयोध्येचे… केंद्र विश्वचैतन्याचे
पाचशे वर्षांच्या संघर्षानंतर अयोध्येत आता भव्य राममंदिर निर्माण सुरु आहे..
या ऐतिहासिक संघर्षाचा व राममंदिर निर्माण प्रक्रीयेचा रोचक आणि मुद्देसूद आढावा घेणारे प्रेरक पुस्तक !!!
शेअर-ललित
शेअर आणि ललित यांची सांगड घालणारे, खुसखुशीत, खुमासदार शब्दात शेअर बाजाराविषयी थोडक्यात माहिती देणारे अर्थतज्ञ श्री.चंद्रशेखर टिळक यांचे “शेअर ललित ” हे 27 वे नविन पुस्तक.
स्नेहज्योत
कळत्या – घडत्या वयातले
अनेक क्षण ज्योत बनून राहतात .
अशा क्षणांना अर्पण केलेले हे पुस्तक !
जगद्गुरु श्रीमद् शंकराचार्य
जगद्गुरु श्रीमद् शंकराचार्य या पंडीत दीनदयाल उपाध्याय लिखित मूळ हिंदी पुस्तकाचा श्री.लक्ष्मण ढवळू टोपले यांनी केलेला मराठी अनुवाद
स्वातंत्र्यवीर सावरकर: परिचित-अपरिचित
स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी परिचित अपरिचित दुर्मिळ माहिती संदर्भ, पुराव्यासह मांडणारे पुस्तक
समर्थव्रती सुनील चिंचोलकर
समर्थभक्तीने भारलेला हा समर्थांचा आधुनिक काळचा निस्पृह, निरलस, निगर्वी, निर्भय, आणि निडर.. महंत.!!!
समर्थांचा दासबोध जगणारे.. समर्थ संप्रदायाचा चालता बोलता विश्वकोष….
असंख्य समर्थ भक्तांच्या मना मनातून वसलेले हे ‘समर्थव्रती’ घडले कसे? तपाचरणातून ‘समर्थींचा महंत‘ हे कष्टसाध्य रुपांतरण आणि नंतरच प्रबोधनाच विलक्षण जीवन कार्य कसं होतं?
वाचा सुनीलजींची ही प्रेरणादायी जीवन गाथा !!
श्री दासलीला
अत्यंत सोपी, गोड रसाळ आणि प्रासादिक रचना असलेले,यती आनंद चैतन्य स्वामी यांच्या आज्ञेने व कृपाशीर्वादाने योगीराज महाराजांना स्फुरलेले हे ओवीबद्ध समर्थ चरित्र म्हणजे आनंदाचा ठेवाच आहे.या ग्रंथाचे पठण, श्रवण, मनन म्हणजेच मनोभावे पारायण हेच कलियुगात चिंतामुक्तीचे, समर्थ कृपेचे सुलभ साधन आहे असे योगीराज महाराजांनी निश्चितपणे या ग्रंथाच्या शेवटी सांगितले आहे. योगीराज म्हणतात..दासलीला सुरद्रुम | मोक्षफळें दाटला परम | भाविकाचें सकळ काम | पूर्ण होती || हा दासलीला चिंतामणी |नुरू देचि चिंता मनी |भाविकाते सायुज्यदानी | समर्थ होये || सद्भावे करिता ग्रंथाचे श्रवण | सकळ पातकें होती दहन | ज्ञान वैराग्य भक्ति पूर्ण | उपजे चित्ती ||
सुभाष बावनी – नेताजी सुभाषचंद्र बोस यांची ललित क्रांतिकथा
दासबोधातील विवेक मोती
“विवेक” हा समर्थांच्या फार आवडीचा विषय आहे. प्रस्तुत पुस्तकामध्ये लेखक शिवराम सोनार यांनी, दासबोधातील “विवेक” विषयक ओव्या निवडून, त्यावर सोपे स्पष्टीकरण केले आहे. अश्या एकूण ‘विवेक’ विषयक ३५८ ओव्या आणि त्या वर आधारित भाष्य असे पुस्तकाचे स्वरूप आहे..
डॉ.सच्चिदानंद शेवडे आणि डॉ.परीक्षित शेवडे लिखित चार पुस्तकांचा संच विशेष व भरघोस सवलतीत
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त खास….
डॉ.सच्चिदानंद शेवडे आणि डॉ.परीक्षित शेवडे लिखित चार पुस्तकांचा संच विशेष व भरघोस सवलतीत..
YOGA DARSHANA (With reference to Vyasabhashya)
This book is a sequel to the author’s earlier book, ‘Patanjal Yoga Darshana’ written in marathi. In this volume, however, the author has extensively referred to ‘Vyasabhashya’,the first Sanskrit commentary on Yoga Sutras.
‘Yoga Darshana’ is not a mere speculative enquiry. It is a doctrine that makes one ‘see’ and experience the reality.Patanjali has elucidated a way of life that helps transcend all limitations of a human being.
दासबोध चिंतनसार
वाचकांना दासबोधाच्या आधिक अभ्यासाकडे आपोआप प्रवृत्त करणारा असा सोपा व सुटसुटीत ग्रंथ !!
तेजोनिधी सावरकर
हिंदुत्व सोडून इंद्रपद जरी मिळत असेल तरी पहिला हिंदुत्वद्रोही होऊन इंद्रपदी विराजमान होण्यापेक्षा
अखेरचा हिंदुत्वनिष्ठ म्हणून लढता-लढता मरण पत्करणे योग्य ठरेल.-स्वातंत्र्यवीर सावरकर
ख्रिस्ती धर्माचा काळा इतिहास
जागतिक इतिहास ख्रिस्ती अधर्माच्या काळ्या इतिहासाने कलंकित झाला आहे. त्या कलंकाचा हा एक संक्षिप्त आलेख.
सरदार वल्लभभाई पटेल
स्वातंत्र्योत्तर एकात्मिक भारताचे शिल्पकार म्हणून अतुलनीय कामगीरी करणा-या सरदार वल्लभभाई पटेलांची जीवनगाथा उलगडणारा ग्रंथ !
कठोर,कणखर, लोहपुरुष, दृढनिश्चयी सरदारांचे देशहितास वाहिलेले जीवन म्हणजे त्या काळचा इतिहास, सत्य आणि तथ्य, संदर्भासहित मांडणारा ललित लेखनाच्या शैलीतील ग्रंथ !
पालकनीती
बदलत्या काळात वर्षानुवर्षे खोलवर रुजलेल्या कल्पना झुगारून देण्याच्या संगणक युगात मुलांना समजून घेण्याची पालकनीती ..
रामायण कथासार
अक्षर आणि अक्षय वाड्मयातील ‘ रामायण ‘ या विषयावरील सौ.अलका मुतालिक यांचा हा ग्रंथ श्रवणानंद देऊन मग वाचनानंदाची विशेष अनुभूती देणारा आहे.
रामकथा ‘ सांगितली ती लिहिली ‘ या भूमिकेतून अलकाताईंच्या रामायण लेखन प्रवासात महर्षी व्यास- वाल्मिकींपासून नाथ महाराज,गोस्वामी तुलसीदास, समर्थ रामदास,वेणास्वामी, डॉ.देशमुखकाका, पू.मंदाताई आणि श्रद्धेय मुळेशास्त्री अशा अनेक प्राचीन- अर्वाचीन महानुभावांनी घडविलेले रामकथा वाड्मय या सगळ्यांचे अवलोकन करून सौ. अलका ताईंनी आपल्या रामकथेची मांडणी अत्यंत ओघवत्या शब्दात सादर केली आहे.
राहुल विरचित महाभारतातला उफराटा घटोत्कच
राहुल गांधी हे कॉंग्रेसचे उपाध्यक्ष झाल्यापासून त्यांच्यामुळे कॉंग्रेसचा कसा र्हास होईल, त्याचे भाकित भाऊंनी सातत्याने केले होतेच. पण राहुल कॉंग्रेस अध्यक्ष झाल्यानंतर ते कॉंग्रेससोबत पुरोगामी पक्षांचाही कपाळमोक्ष घडवून आणणार; हे भाकित नुकत्याच संपलेल्या लोकसभा निवडणुकीने अचुक खरे ठरवले आहे. त्याचाच आलेख म्हणजे हे पुस्तक होय.