प्रभू श्रीरामांचे जन्मस्थान असलेल्या अयोध्या येथे चार कार्यकर्त्यांनी ” पर्यटन नव्हे..तीर्थाटन ” केल्यावर मनामध्ये उमटलेले तरंग म्हणजे हा लेखप्रपंच.
सुमारे 500 वर्षांपासून रामजन्मभूमी मुक्तिचा सुरु असलेला लढा, त्यातील विविध स्थित्यंतरे, आंदोलनामध्ये सहभागी झालेला सकल समाज व संघटनशक्ती आणि अखेरीस न्यायालयीन लढ्याला मिळालेले यश अशा घडामोडींचे छायाचित्रांसहित केलेले रोचक वर्णन या पुस्तकामधे आहे.
‘सौगंध राम की खाते हैं, मंदिर वही बनाएँगे ‘ या घोषणेने सुरवात झालेल्या या आंदोलनाची अखेर केवळ अयोध्येत भव्य राममंदिर तयार होण्यातच नव्हे तर ते भारताच्या राष्ट्रीय अस्मितेचे प्रतीक आणि जागतिक किर्तीचे आध्यात्मिक ऊर्जा केंद्र म्हणून प्रस्थापित होण्यात होते आहे.
तीस वर्षांपूर्वीच्या या यशस्वी लढ्याचा हा दैदिप्यमान आलेख, प्रस्तुत पुस्तकातून त्याचा घेतलेला मागोवा, एक दस्तऐवज म्हणूनही आजच्या आणि येणाऱ्या पुढील अनेक पिढयांसाठीही प्रेरणास्त्रोत ठरेल हे निश्चित. !!!
Reviews
There are no reviews yet.