Biography

Author Picture

कौस्तुभ कस्तुरे

पुस्तके:

१) पेशवाई- महाराष्ट्राच्या इतिहासातील एक सुवर्णपान (डिसेंबर २०१५)
२) पुरंदरे- अठराव्या शतकातील एक कर्तबगार घराणे (डिसेंबर २०१६)
३) इतिहासाच्या पाऊलखुणा भाग १ व भाग २ (सहलेखन, २०१५ व २०१६)
४) सकलराजकार्यधुरंधर सदाशिवरावभाऊ (मे २०१७)
५) समर्थ- समकालीन कागदपत्रांतून घडणारे रामदासदर्शन (मे २०१९)
६) प्रतिशोध ..पानिपतचा - ऐतिहासिक कादंबरी (डिसेंबर २०१९)

• पुरस्कार/सन्मानचिन्ह:

१) राष्ट्रीय मोडी इतिहास प्रबोधिनी (२०१५, २०१६)
२) सह्याद्री प्रतिष्ठानचा सह्याद्री विशेष सन्मान (२०१७)
३) श्री शिवाजी राजगड स्मारक मंडळ स्मृतिचिन्ह (२०१८)
४) वक्तृत्वोत्तेजक सभा- वसंत व्याख्यानमाला (२०१८)
५) श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाचा डॉ. सदाशिव शिवदे स्मृती पुरस्कार (२०१९)
६) ब्राम्हण जागृती सेवा संघाचा इतिहासातील योगदानानिमित्त पुरस्कार (२०२०)
७) व इतर सन्मानचिन्ह.

• छत्रपती शिवाजी महाराजांनी समर्थ रामदासस्वामींना दिलेल्या चाफळ सनदेचा लंडन येथील ब्रिटिश लायब्ररीत असलेला फोटोझिंकोग्राफ श्री, संकेत कुलकर्णी आणि सहकाऱ्यांसह डिसेंबर २०१७ मध्ये पुण्याच्या भारत इतिहास संशोधक मंडळात प्रकाशित, तसेच या सनदेच्या अस्सलतेविषयी पुरावे सादर करणाऱ्या शोधनिबंधाचे वाचन. हा शोधनिबंध भारत इतिहास संशोधक मंडळाच्या जुलै २०१८ रोजीच्या त्रैमासिकात प्रसिद्ध झाला आहे.

• मोडी लिपी जाणकार. मोडीचा व्यावसायिक वापर न होता इतिहास संशोधनासाठी वापर व्हावा यासाठी प्रयत्नशील. सदर उद्देश समोर ठेऊन निरनिराळ्या संस्था आणि महाविद्यालयांमध्ये मोडीवर कार्यशाळा आणि व्याख्याने दिली आहेत. याशिवाय मोडी लिपी संगणकावर लिहिता यावी म्हणून 'मोडी कस्तुरे' या फॉण्टची निर्मिती केली आहे. हा फॉन्ट डाउनलोड करण्यासाठी ब्लॉगवर मोफत उपलब्ध करून देण्यात आला आहे.

• 'इतिहासाची सुवर्णपाने' अर्थात www.kaustubhkasture.in या मुख्यत्वेकरून अठराव्या शतकातील मराठा इतिहासाशी निगडित ब्लॉगचे इ.स. २०१४ पासून लेखन. पाच वर्षात साधारणतः पाच लाखांहूनही हिट्स आणि वाचकांकडून उत्तम प्रतिसाद.

• फेसबुकसारख्या सोशल मीडिया साईटवर 'इतिहासाच्या पाऊलखुणा' या नावाने इतिहासप्रेमींकरिता समूह, त्यामार्फत सहकारी-मित्रांच्या सोबत इतिहास आणि मोडी लिपी बाबत जनजागृती. सदर समूहातर्फे दरवर्षी किल्ल्यांची भेट, निरनिराळे इतिहास विषयक विशेष ऑनलाईन सप्ताह असे अनेक उपक्रम राबवले जातात.

• महाराष्ट्र टाइम्स वृत्तपत्रात तसेच निरनिराळ्या मासिकांमधून इतिहासाशी निगडित लेख प्रसिद्ध झाले आहेत.