‘मोरया’ चे ‘सरदार’ – दिलीप महाजन यांचे विशेष प्रकाशकीय

सरदार वल्लभभाई पटेल यांचे जीवनचरित्र रेखाटणारा #सरदार हा #सौस्मिताभागवत लिखित ग्रंथ प्रकाशित करतांना एका वेगळ्या आनंदाची भावना मनात आहे.
आम्ही मूळ मराठवाड्यातील ‘ धाराशिव ‘ ( उस्मानाबाद ) चे रहाणारे. मराठवाडा हा हैदराबादच्या ‘ निजाम स्टेट ‘ चा भाग होता. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर देशातील ५६५ पैकी ५६२ छोटी-मोठी संस्थाने सरदार पटेलांनी भारतात विलीन करुन घेतली पण काश्मीर,जुनागड आणि हैदराबाद या संस्थानांनी विरोध केला होता. सरदार पटेलांना डावलून नेहरुंनी काश्मीर चा प्रश्र्न UNO त नेऊन त्याचे ‘ भिजत घोंगडे ‘ कसे केले हे सर्वश्रुतच आहे. पण हैद्राबाद व जुनागड या संस्थानांना सरदारांच्या कणखर भुमिकेपुढे शरणागती पत्करावी लागली व ही संस्थाने अखेरीस भारतात विलीन झाली. मराठवाडा मुक्तीसंग्रामातील रझाकरांचा आत्याचार तर आमच्या वाडवडिलांनी भोगला होता. या अमानुष अत्याचाराच्या कहाण्या ऐकतच आम्ही लहानाचे मोठे झालो. त्यामुळे निजामशाहीला नमविणा-या ‘सरदारांबद्दल’ तेंव्हा पासूनच एक आपुलकीयुक्त श्रद्धेची व आदराची भावना मनात मध्ये रुजली होती.

स्वातंत्र्योत्तर एकात्मिक भारताचे शिल्पकार म्हणून अतुलनीय कामगीरी करणा-या सरदार वल्लभभाई पटेल यांची जीवनगाथा उलगडणारा एखादा ग्रंथ ‘मोरया’ चा ही असावा अशी खूप दिवसांची सूप्त इच्छा सौ.स्मिता भागवतांच्या ‘ सरदार’ या ग्रंथाच्या रुपाने पूर्ण होत असतांना आनंद आणि अतीव समाधानच नव्हेतर एक कर्तव्यपूर्तीची अनुभूतीही आहे.

विशेष म्हणजे या ग्रंथाच्या लेखिका सौ स्मिता भागवतांना त्यांच्या तान्हेपणी साक्षात सरदारांचा झालेला ‘परिसस्पर्श ‘.!!!
भागवत या मूळच्या बडोद्याच्या व पूर्वाश्रमीच्या कप्तान घराण्यातील. कप्तान व भागवत दोन्ही घराणी क्रांतीकार्यात सहभागी असल्याने सरदारांच्या विशेष संबंधित होती. त्यामुळे सरदारांनी तान्हेपणी मांडीवर घेऊन ‘ विजया ‘ असे नामकरण करुन आशिर्वाद प्राप्त करण्याचे भाग्य त्यांना लाभले होते.
आज गुजरातेतील भारतमातेचे दोन सुपुत्र तिचे गतवैभव पुनश्च प्राप्त करुन देण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत असतांना , भारताला एकसूत्रात जोडणा-या ‘ सरदारांच्या ‘ कार्याची महती ‘ Statue of Unity ‘ या जगातील सर्वात उंच पुतळा ऊभारुन सांगत असतांनाच्या पार्श्र्वभूमीवर, सौ. स्मिता भागवत यांच्या सारख्या देशभक्तीचा वारसा लाभलेल्या लेखिकेच्या मनातील ‘ सरदार ,’ साकार करण्याचे महत्भाग्य आम्हास प्राप्त झाले याचा आम्हाला अभिमान आहे.
मोरया प्रकाशनाच्या याही दर्जेदार साहित्यकृतीचे स्वागत आपण सर्व मायबाप वाचक नेहमीप्रमाणे करालच याचा विश्वास वाटतो.

दिलीप महाजन

सौ.स्मिता भागवत लिखित '#सरदार...वल्लभभाई पटेल ' या मोरया प्रकाशन लवकरच प्रकाशित करीत असलेल्या महत्वपूर्ण ग्रंथातील काही भाग...

March 11, 2020

काय चुकले ? काय हुकले ? - शेअरबाजार-चन्द्रशेखर टिळक यांचा लेख

March 11, 2020

One Thought on ‘मोरया’ चे ‘सरदार’ – दिलीप महाजन यांचे विशेष प्रकाशकीय

  1. I need this.

Leave a Reply