मराठी भावसंगीतातील ‘ शुक्रतारा ‘ असणारे ज्येष्ठ गायक श्री. अरुणजी दाते यांनी आपला ५५ वर्षांचा गायन प्रवास या पुस्तकात उलगडून दाखवला आहे. गायन क्षेत्रात पदार्पण करण्यापूर्वी आपल्या घरातील सांगीतिक पार्श्वभूमी, सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ गायकांचा, साहित्यिकांचा लाभलेला सहवास, आईवडिलांची कलासक्त ,सकारात्मक आणि माणूस जपण्याची शिकवण यासर्वांमुळे ते एक कलाकार व व्यक्ती म्हणून कसे घडत गेले,याचे फार सुंदर चित्रण त्यांनी या पुस्तकात केले आहे.