आई s s…. भूक लागली ….. काय बरे द्यायचं सारख खायला? हे नको ,ते नको,हे कालच खाल्लय, नुडल्स ,वेफर्स ,केक ,पिझ्झा ,चायनीज ,बर्गर आणूयात ना काहीतरी…….. काय करावे या फास्ट फूड पेक्षाही झटपट ,स्वस्त ,खरोखर पौष्टिक आणि भूक भागवणारे ? आजच्या काळात प्रत्येक स्त्रीला ,हो अगदी प्रत्येक स्त्रीला मग ती फुल टाईम गृहिणी असो अथवा करियर करणारी….सतत भेडसावणारा प्रश्न ! एकीकडे बाजारात उपलब्ध होणारे फास्ट फूडचे नवे नवे प्रकार ,ते आपण घ्यावेत म्हणून होणारा जाहिरातींचा मारा तर एकीकडे आरोग्याचा प्रश्न आणि ते सांभाळण्याची जबाबदारी तिच्यावरच. म्हणूनच हे पुस्तक,अस्सल पारंपारिक आणि पौष्टिक न्याहारीच्या विविध प्रकारांची ओळख पुन्हा एकदा करून देणारे आणि ते झटपट करता यावेत म्हणून उपयुक्त टीप्स ही देणारे.
Reviews
There are no reviews yet.