भाऊ तोरसेकर हे अर्धशतकाहून अधिक काळ मराठी पत्रकारिता करीत आहेत. महाराष्ट्र व भारतीय राजकारणातील अनेक घडामोडींचे समकालीन अभ्यासक आहेत. सहा महिन्यांपुर्वीच त्यांचे ‘पुन्हा मोदीच का? हे पुस्तक अशीच भविष्यवाणी ठरली. मोदींना ३००+ जागा मिळतील असे ठाम भाष्य करणारे तेच देशातले एकमेव पत्रकार ठरले. महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणूकीत काय होईल, त्याबाबतीतले त्यांचे भाकित म्हणजे हे ताजे पुस्तक.
नुसत्या नव्या निवडणूकाच नाहीत, तर महाराष्ट्राच्या पाच दशकातील राजकारणाचा उहापोह आणि त्यात भाजपा किंवा युतीच्या अजिंक्य होण्यामागचा इतिहासच त्यांनी यातून उलगडला आहे. निवडणूकातला पराभूत हा विजेत्याच्या यशात कसे योगदान देतो, त्याचे विवेचन कुठल्याही राजकीय अभ्यासकाला चकीत करून सोडणारे ठरावे. भाऊंच्या मते आगामी विधानसभा निवडणूक ही नवा सत्ताधारी पक्ष वा आघाडी ठरवण्यासाठी होत नसून, भविष्यातले विरोधी पक्ष ठरवण्यासाठी होत आहे.
Reviews
There are no reviews yet.