सामर्थ्यासाठी रामकथा – रामकथा लेखन स्पर्धा विशेष लेख – सौ.सुरेखा महाजन

।।श्रीराम ।।
धर्मज्ञः सत्यसंघश्च प्रजानां च हिते रतः। यशस्वी ज्ञानसम्पन्नः शुचिर्वश्यः समाधिमान्।।


अर्थ- प्रभु रामचंद्र हे धर्मज्ञ, सत्यप्रतिज्ञासंपन्न, प्रजेचे हित करणारे, सदैव यशस्वी, ज्ञानी, पवित्र आणि एकाग्रचित्त असे असणारे आहेत.अशा श्रीरामांना नमस्कार असो.

-वाल्मिकी रामायण.


रघुनंदनाच्या कथेइतकी सुंदर कथा, एवढी दिव्य कथा या जगात खरोखर अन्य नाही. रात्रंदिवस मनुष्याला ज्या एका रूपाचा, ज्या एका नामाचा ध्यास घेऊन जगावेसे वाटते, तसेच ज्या एका चरित्राने संपूर्ण जीवन कृतार्थ व्हावे असे वाटते, ते सारे रसायन या एका रामकथेमध्ये मिळते.


“आपलं व्यक्तिगत जीवन, कौटुंबिक जीवन आणि संपूर्ण सामाजिक जीवन उजळून टाकण्याकरिता ज्या दिव्य गाथेची,ज्या दिव्य कथेची,ज्या दिव्य आदर्शाची आज आवश्यकता आहे,ती रामकथा आहे”

स्वामी गोविंद देव गिरि


मर्यादापुरूषोत्तम श्री राम हे सर्व भारतवर्षाचे श्रद्धेय दैवत आहेत, आदर्श आहेत कायण आदर्श पुत्र, आदर्श भ्राता, आदर्श पति आणि आदर्श राजा इतक्या सगळ्या गुणांचा समुच्चय त्यांच्यामध्ये आहे. म्हणूनच युगानुयुगे आजतागायत जगामध्ये त्यांचं चरित्र गायलं जातयं तरी त्यातील गोडी कमी होत नाही उलट अजूनही ते “पुनी पुनी कितनेहु सुनी सुनाई । दिल की प्यास बुझत ना बुझाएँ ।।” असच वाटत राहतं.
पण आज आपण ज्या कलियुगात वावरतो त्या कलियुगात’रामा’शिवाय आपला दुसरा कुणीही त्राता नाही.“रामान्नास्ति परायणं परतरम्” ही अवस्था आहे.
विशेषतः आपल्या पुढील पिढ्यांना या काळांत जगण्यासाठी सक्षम आणि सामर्थ्यवान बनवायचे असेल तर त्यांच्यामध्ये श्रीरामांचे असंख्य गुण जागवावे लागतील. त्यांच्यामधूनच सत्छिल,सचोटी,संस्काराने युक्त सुजन निर्माण करायचे असतील तर त्यांच्यापुढे वारंवार रामकथा ठेवली पाहिजे, सांगितली गेली पाहिजे.
यासाठीच आत्ताच्या पिढीतील आजी-आजोबा, आई- बाबा, दादा-वहिनी, भाऊ-बहिणी,आत्या मावशी, काका-काकू, मामा-मामी कोणीही अथवा सगळ्यांनी आपल्यातल्याच छोट्यांसाठी, बाल-गोपाळासाठी, नातवंड-पतवंडासाठी लिहाच आपल्याच भाषेत छानपैकी एक गोड “रामकथा’.Ramkatha writing contest by Moraya Prakashan
कथा छोट्यांना रूचणारी, पटणारी, आवडणारी तर हवीच पण त्यातून सगळ्यांनाच आनंद मिळाला पाहिजे.अर्थात रामाचीच कथा ती पण त्यातील ‘रामसुख’ सर्वात वाटता आलं पाहिजे. श्रीरामांचं आगळवेगळ रूप त्यातून साकारलं गेलं पाहिजे. अनेकविध रामायणांतून एखादीच सुंदर कथा उलगडून त्यातील राम शब्दांची जादू अगदी सहज दाखवली पाहिजे.
मग काय…..करताय ना सुरूवात रामकथा लिहायला !!

-सौ.सुरेखा महाजन

डॉ.श्यामा घोणसे - जन्माष्टमी विशेष लेख - "माऊली"

April 13, 2021

Leave a Reply