डॉ.म.वि.गोखले यांनी केलेले ‘ श्री संत नामदेव कृत श्री ज्ञानेश्वर गौरव’ अर्थात आदि, तीर्थावेळी आणि संजीवन समाधी या प्रकरणांवर केलेले निरुपण पहिले. खूप समाधान वाटले. संजीवन समाधी प्रकरण तर श्री नामदेव महाराजांनी अशा शब्दात मांडले आहे की पाषाण हृदयाच्या माणसाच्या डोळ्यांतही पाणी उभे राहावे. अंतःकरणाने श्रद्धासंपन्न आणि बुद्धीचे वर्म जाणणारा या प्रसंगाचे महत्व आणि गूढ जणू शकतो. डॉ.म.वि.गोखले यांचे निरुपण म्हणूनच महत्वाचे आहे. ते स्वतः संतवाङ्मयाचे-संत चिकित्सक अभ्यासक आहेत. संतवचनावर व संतचरणावर त्यांची पूर्ण निष्ठा आहे.त्यांच्या लिखाणालाही श्रद्धेची जोड आहे भावाचा ओलावा आहे. केवळ अभ्यासाचा रुक्षपणा त्यात नाही म्हणूनच अभंगांवरील त्यांची टिपणी विचाराला अधिक प्रवृत्त करणारी आहे. योग मार्गाचा त्यांनी केलेला चिंतनीय आहे.हे अभंग संदर्भासह स्पष्ट करून त्यांनी मोठे कार्य केले आहे.
Binding | Paperback |
---|---|
Language | Marathi |
Pages | |
Weight | |
Author |
डॉ. म.वि.गोखले |