रामायण कथासार

अक्षर आणि अक्षय वाड्मयातील ‘ रामायण ‘ या विषयावरील सौ.अलका मुतालिक यांचा हा ग्रंथ श्रवणानंद देऊन मग वाचनानंदाची विशेष अनुभूती देणारा आहे.
रामकथा ‘ सांगितली ती लिहिली ‘ या भूमिकेतून अलकाताईंच्या रामायण लेखन प्रवासात महर्षी व्यास- वाल्मिकींपासून नाथ महाराज,गोस्वामी तुलसीदास, समर्थ रामदास,वेणास्वामी, डॉ.देशमुखकाका, पू.मंदाताई आणि श्रद्धेय मुळेशास्त्री अशा अनेक प्राचीन- अर्वाचीन महानुभावांनी घडविलेले रामकथा वाड्मय या सगळ्यांचे अवलोकन करून सौ. अलका ताईंनी आपल्या रामकथेची मांडणी अत्यंत ओघवत्या शब्दात सादर केली आहे.

200.00

Categories: ,
अक्षर आणि अक्षय वाङ्मयातील ‘ रामायण ‘ या विषयावरील सौ.अलका मुतालिक यांचा हा ग्रंथ श्रवणानंद देऊन मग वाचनानंदाची विशेष अनुभूती देणारा आहे.
रामकथा ‘ सांगितली ती लिहिली ‘ या भूमिकेतून अलकाताईंच्या रामायण लेखन प्रवासात महर्षी व्यास- वाल्मिकींपासून नाथ महाराज,गोस्वामी तुलसीदास, समर्थ रामदास स्वामी ,वेणास्वामी, डॉ.देशमुखकाका, पू.मंदाताई आणि श्रद्धेय मुळेशास्त्री अशा अनेक प्राचीन- अर्वाचीन महानुभावांनी घडविलेले रामकथा वाङ्मय  या सगळ्यांचे अवलोकन करून सौ. अलकाताईंनी आपल्या रामकथेची मांडणी अत्यंत ओघवत्या शब्दात सादर केली व तिचेच हे मूर्तिमंत शिल्प प्रस्तुतच्या ग्रंथाद्वारे वाचकांसाठी सिद्ध केले आहे.
‘ रामायण कथासार ‘ हा सिमित प्रसंगावर आधारित ग्रंथ असला तरी साहित्य मूल्य, विषय वैविध्य आणि भाषा समृद्धी यांच्या समर्थ व सहज मांडणीद्वारे ‘ रामायण ‘ मनावर ठसविण्यात अलकाताई यशस्वी झाल्या आहेत.
या सुंदर ‘ रामायण कथासार ‘ ग्रंथाच्या प्रकाशनाने  ‘ मोरया प्रकाशन ‘ च्या दर्जेदार प्रकाशित ग्रंथमालेमध्ये ‘ मूल्यवान ‘  भर पडली आहे.
वाचक  या सुंदर रामकथेचे यथोचित स्वागत करतील असा विश्वास आहे.
स्वामी गोविंददेव गिरि

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “रामायण कथासार”