Biography

Author Picture

जगमोहन

स्वातंत्र्योत्तर काळात भारताने सर्वोच्च प्रतीचे सनदी अमलदार दिले. त्यात श्री. जगमोहन यांचा नक्कीच समावेश होतो. दिल्लीचे ते सर्वात तरुण उपराज्यपाल होते आणि दोन मुदती या पदावर राहिलेने ते एकमेव राज्यपाल आहेत.

दिल्लीचे उपराज्यपाल म्हणून आपल्या दुसऱ्या कारकिर्दीत त्यांनी एशियाड, चोगम (CHOGM) आणि अलिप्त राष्ट्रपरिषद या कार्यक्रमांचे स्पृहणीय आणि यशस्वी आयोजन केलं. तत्पूर्वी त्यांनी अनेक महत्त्वाच्या पदावर अलौकिक कामगिरी बजावली. त्यात दिल्ली विकास प्राधिकरणाचे मुख्य कार्याधिकारी हे पद उल्लेखनीय या पदावर से सात वर्ष होते. नंतर ते गोवा, दीव आणि दमणचे उपराज्यपाल राहिले. भारताच्या राष्ट्रपतींनी त्यांचा पद्मपुरस्कारांनी दोनदा गौरव केला.

एकाच व्यक्तींचा दोनदा असा गौरव होणं हा एक दुर्लभ सन्मान आहे.

"दिल्लीची महाविकास योजना तयार करुन ती अमलात आणल्याबद्दल आणि इतर योजनांची आखणी उभारणी व अंमलबजावणी फार उत्तम केल्याबद्दल त्यांना पद्मश्री किताब देण्यात आला. 'देशासाठी अद्वितीय अशी गुणसंपन्न सेवा बजावल्याबद्दल त्यांना नंतर 'पद्मविभूषण' देऊनही गौरविण्यात आले. १९७५ मध्ये श्री. जगमोहन यांना ऑस्ट्रेलिया सरकारनं सांस्कृतिक पुरस्कारही दिला.

सहाव्या दशकाच्या मध्यात त्यांना इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक अॅडमिनिस्ट्रेशन (नवी दिल्ली) या संस्थेने एक फेलोशिप दिली. तिच्या अंतर्गत त्यांनी जगभर प्रवास केला. 'मानवी वसाहती' आणि 'हॅबिटाट' या संयुक्त राष्ट्रांच्या दोन परिषदांना अनुक्रमे तेहरान आणि व्हॅन्कुवर इथं से भारताच्या वतीने हजर होते.

श्री. जगमोहन यांनी विविध प्रमुख नियतकालिक व वृत्तपत्रातून ७०० वर लेख लिहिले आहेत. त्यांची

"बिल्डिंग शहाजहानाबाद', 'द वॉल्ड सिटी ऑफ देहली', 'आयलंड ऑफ ट्रुथ', 'द चॅलेज ऑफ अवर सिटीज', 'सोल अॅण्ड स्ट्रक्चर ऑफ गव्हर्नस इन इंडिया'. 'शेपिंग इंडियाज न्यू डेस्टिनी', 'रिफॉर्मिंग वैष्णोदेवी 'इत्यादी पुस्तकं प्रसिद्ध झालेली आहेत.

राज्यसभेचे माजी खासदार व केंद्रीय मंत्री श्री जगमोहनच असे अद्वितीय नागरिक आहेत की ज्यांनी जम्मू व काश्मीरचे राज्यपालपद दोनदा भूषविले आहे. त्यांनी 'माता वैष्णोदेवी मंदिर प्रतिष्ठानात ऐतिहासिक सुधारणाही घडवून आणल्या.