नवरात्रात माता वैष्णोदेवीवरील हे पुस्तक नक्की वाचा !!
जम्मू आणि काश्मीरचे पूर्व राज्यपाल श्री.जगमोहन यांच्या Reforming Vaishno Devi and a case for Reformed,Reawakened and Enlightened Hinduism इंग्रजी ग्रंथाचा भावानुवाद डॉ.सच्चिदानंद शेवडे यांनी केला आहे तो मिशन वैष्णोदेवी-संघर्ष आणि उत्कर्ष या शीर्षकाने . या ग्रंथात राज्यपालांच्या मर्यादेत राहूनही जनोपयोगी कार्य कसे करता येते हे जगमोहन यांनी दाखवून दिले आहे.. कतरा पासून वैष्णोदेवी पर्यंतचा परिसर हा अत्यंत गलिच्छ होता.देवस्थानची अवस्था चांगली नव्हती..दर्शन आणि राहणे या बाबींसाठी यात्रेकरूंची लुट होणे नित्याचे होते…मार्ग खडतर होता.बाणगंगेच्या परिसरात स्नानाची आणि कपडे बदलण्याची कोणतीही व्यवस्था नव्हती ….देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या सामान्य यात्रेकरूची फसवणूक होत असे…तीर्थस्थानी आल्यावर मानसिक शांती आणि समाधान लाभावे असे कोणतेही वातावरण तेथे नव्हते…उदासीनता आणि खिन्नता दाटून आल्याचे जगमोहनना दिसले त्यामुळे ते अस्वस्थ झाले आणि आपल्या अधिकारांचा उपयोग करून त्यांनी आज ते देवस्थान अतिशय रम्य आणि देखणे बनविले आहे…त्यासाठी त्यांना स्थानिक लोकांचा विरोध सहन करावा लागला…ज्यांच्या आर्थिक बाबी निगडीत होत्या अशा लोकांशी आणि नेत्यांशी सामना करावा लागला…तो सर्व संघर्ष आणि त्याचे फळ म्हणजे आज त्या देवस्थानाचा झालेला उत्कर्ष त्यांनी या ग्रंथात मांडला आहे…या शिवाय त्यांना अभिप्रेत असलेल्या हिंदू धर्माची संकल्पना त्यांनी यात ग्रथित केली आहे….आज आपले पंतप्रधान प्रमुख देवस्थानांच्या विकासाच्या गोष्टी बोलत आहेत तेव्हा त्यांच्यासमोर रोलमॉडेल म्हणून वैष्णोदेवी संस्थान नक्कीच असेल….अनेक छायाचित्रे आणि सुबक छपाईने हे पुस्तक नटले आहे.
Reviews
There are no reviews yet.