Look Inside

नर्मदा परिक्रमा:एक आनंदयात्रा

नर्मदा मैयाच्या असीमकृपेने तीनदा पायी परिक्रमा करणारे नर्मदा मैयाचे परमभक्त
श्री. उदयन् आचार्य यांच्या अनुभवकथनाने साकार झालेला रसाळ ग्रंथ!!

350.00

Ends in
Saving 100% Value 350.00 You Save 350.00

आविष्कार नर्मदेच्या सौंदर्याचा ! अनुभव नर्मदा काठच्या प्रेमाचा आणि “माणूस” नावानं जगणाऱ्या तिथल्या देवाचा !
सुविख्यात व्याख्याते, भागवत व रामायणकथाकार,साहित्यिक व विचारवंत डॉ.सच्चिदानंद शेवडे यांची प्रस्तावना श्री उदयन् आचार्य लिखित ‘ नर्मदा परिक्रमा:एक आनंदयात्रा ‘ या प्रासादिक ग्रंथास लाभली आहे.डॉ.शेवडे आपल्या प्रस्तावनेत म्हणतात………

उदयन् आचार्य यांच्या लिखाणाचे वैशिष्ट्य म्हणजे अत्यंत प्रांजळपणा, ओघवती आणि चित्रदर्शी शैली होय. वाचत असताना त्यांच्यासोबत या आनंदयात्रेत आपण अगदी सहजपणे सहभागी होतो. त्यांच्या डोळ्यांनी आपण तो सर्व अनुभव घेत राहतो. तो घेताना मनाला एक अनिर्वचनीय आनंद होतो. उदयन हे शब्दांशी खेळणारा लेखक नव्हेत. त्यामुळे त्यांच्या सरळसोट लेखनातील प्रामाणिकपणा आपल्या मनाला भिडतो. हेच या पुस्तकाचे खरे यश आहे असे वाटते. वाचकांना सोबत घेऊन जाणे, आपल्या सुख-दु:खाशी त्यांचे समरस होणे, वाचकाला परिक्रमेला जावेसे वाटावे हे सर्व या एका पुस्तकात उदयन् यांना अगदी सहजपणे साधले आहे.

परिक्रमेतील बारकावे, छोटे छोटे प्रसंग, संपर्कात येणाऱ्या विविधढंगी व्यकतींची व्यक्तिचित्रे, संकट काळी मैय्याच्या प्रसन्नतेची आलेली अनुभूती, मंदिरे किंवा आश्रमातील निर्मोही साधुंचा अकृत्रिम स्नेह, आपल्या कमी होत जाणाऱ्या गरजा, मनात हळूहळू उदयाला येणारे वैराग्य, श्रद्धावान मनाला आलेल्या काही अद्भूत अनुभूती… अशा विविध रसांच्या हिंदोळ्यावर वाचक झुलत राहतो.

याशिवाय लेखनाला साधकाचा एक परीसस्पर्श आहे. त्यामुळे त्यांचे अनुभव, झगझगीत सोनेरी होऊन आपल्या मनाच्या क्षितिजावर भक्तीची पहाट उगवतात.

Binding

Paperback

Language

Marathi

Pages

325

ISBN

978-81-937187-4-2

Edition

6

Author

उदयन् आचार्य

Publisher

Moraya Prakashan

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “नर्मदा परिक्रमा:एक आनंदयात्रा”