फक्त मोदीच
भाऊ तोरसेकर यांच्या अभ्यासपूर्ण राजकीय विश्लेषणातून २०२४ च्या लोकसभा निवडणूकीचा अंदाज घेणारे पुस्तक !!!
लोकसभा निवडणूक निकालाचे असे अंदाज सांगताना हे आकडे कुठून येतात वा कशामुळे येतात,याबद्दल चर्चा करणारे आणि त्यामागचा कार्यकारणभाव उलगडून दाखवणारे हे पुस्तक आहे.
काश्मीर : धुमसते बर्फ
हा काश्मीरचे भूतपूर्व राज्यपाल ,माजी सनदी अधिकारी व माजी केंद्रीय मंत्री श्री. जगमोहन यांच्या मूळ My Frozen Turbulence in Kashmir या इंग्रजी ग्रंथाचा मराठी अनुवाद. हा अतिशय वेधक ग्रंथ, इतिहासाचा वेध घेत, ते जम्मू काश्मीर सारख्या अत्यंत संवेदनशील राज्याचे दोनदा राज्यपाल असताना घडलेल्या घटनांचं सखोल विश्लेषण सादर करतो आणि सांगतो काश्मीर हे अत्यंत खडतर आव्हान फक्त सुधारीत आणि परिष्कृत भारतच पेलू शकेल, असा भारत की ज्याच्यापाशी ‘उद्या’ चा वेध घेणारी दृष्टी आहे व वास्तवाचं भान ठेवून व्याहारिक उपाय योजण्याची जिद्द आहे.