“विवेक” हा समर्थांच्या फार आवडीचा विषय आहे. प्रस्तुत पुस्तकामध्ये लेखक शिवराम सोनार यांनी, दासबोधातील “विवेक” विषयक ओव्या निवडून, त्यावर सोपे स्पष्टीकरण केले आहे. अश्या एकूण ‘विवेक’ विषयक ३५८ ओव्या आणि त्या वर आधारित भाष्य असे पुस्तकाचे स्वरूप आहे..
प.पू.स्वामी गोविंददेव गिरि महाराज हे आजच्या काळातील आद्य श्रीमद् शंकराचार्य, श्री समर्थ रामदास स्वामी आणि स्वामी विवेकानंद यांच्यासम क्षणोक्षणी राष्ट्राच्या हिताचा विचार करणारे आणि तो विचार प्रत्यक्ष कृतीत उतरवून पथदर्शी कार्य सातत्याने करत राहणारे असे ‘राष्ट्रयोगी’ आहेत..त्यांची ही जीवनगाथा आपल्या सर्वांना नित्य कार्यरत राहण्यासाठी ऊर्जा प्रदान करेल.
आगामी विधानसभा निवडणूकीच्या निमित्ताने ताज्या घडामोडींचा परामर्श घेत महाराष्ट्राच्या पाच दशकातील राजकारणाचा उहापोह आणि त्यात भाजपा किंवा युतीच्या अजिंक्य होण्यामागचा इतिहास उलगडणारे पुस्तक!