सर्वसमावेशकता हे श्री रामदासांच्या वाङमयाचे खास वैशिष्ट्य आहे. पोरापसून थोरापर्यंत सर्वांना त्यांच्या साहित्यातून शिकायला मिळेल. विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासासाठी पूरक ठरणाऱ्या शुद्ध विचारांचे संकलन असे या पुस्तकाचे स्वरूप आहे. विद्यार्थ्याच्या व्यक्तिमत्व विकासासाठी प्रयत्नशील शिक्षक, पालक, संस्कारवर्ग चालवणारे कार्यकर्ते यांनादेखील हे पुस्तक अत्यंत उपयुक्त ठरेल.