स्वतःच्या सामर्थ्यावर हिंदू राज्य स्थापन करणाऱ्या शिवप्रभूंचा हा देश आहे. माझा देश स्वतंत्र होईल तेंव्हाच शय्येवर झोपेन, तेंव्हाच मधुर जेवण घेईन, तोपर्यंत हातात तलवार घेऊन परकीयांशी झुंजत राहीन अशी गर्जना करणाऱ्या राणाप्रतापाची ही भूमी आहे. पण आज मात्र कन्याकुमारीपासून हिमालयापर्यंत सारा देश गुलामगिरीत खितपत पडला आहे. पूर्वीही याच भूमीला स्वतंत्र ठेवण्यासाठी कित्येकांनी काळाशी टक्कर दिली. मीही शूरवीरांचा वंशज आहे. आज वयाने लहान आहे, पण शिवरायाने नाही का बालवयातच स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली? मी फक्त विनायक दामोदर सावरकर नाही, मी प्रथम भारतीय आहे. भारतभूमीच्या स्वातंत्र्यासाठी प्रयत्न करणे माझेही कर्तव्य आहे. मुलांनो, जबाबदारी ही कुणी कुणाच्या खांद्यावर द्यायची नसते. मोठी माणसे ती स्वतःहून घेतात आणि पेलतात.
Reviews
There are no reviews yet.