सी.व्ही.रामन यांचे हे छोटेखानी चरित्र तुमच्यापुढे ठेवताना आनंद होतो आहे. खरं सांगायचं तर, हे चरित्र नसून त्यांच्या चरित्राचा धावता आढावा आहे. रामन ज्या काळात लहानाचे मोठे झाले. त्यांना नोबेल पारितोषिक मिळाले, तो काळ पारतंत्र्याचा होता. स्वातंत्र्य आणि संशोधनात्मक बुद्धीला वाव देण्यापेक्षा आपला राज्यकारभार चोखपणे करू शकणारे सुशिक्षित तयार करण्यावर इंग्रज सरकारचा भर होता. नव्हे, तेच त्यांचे उद्दिष्ट होते. देशात विज्ञानविषयक जाणीव नव्हतीच, पण त्याबाबत विशेष आस्थाही नव्हती. संशोधनास आवश्यक त्या सोयी सहजपणे उपलब्ध नव्हत्या. विशेष बुद्धिमत्ता असलेले तरुण स्वतंत्रपणे काहीही करण्यापेक्षा सरकारी नोकरी पसंत करत. त्यामुळे पैसा आणि प्रतिष्ठा सहजपणे मिळत असे. रामन त्यांचे वैशिष्ट्य हे,कि त्यांनी अगदी लहान वयातच मिळालेली उत्तम पगाराची आणि मोठ्या मनाची सरकारी नोकरी सोडली आणि ते विज्ञानाकडे वळले. विज्ञानक्षेत्रात त्यांनी मूलगामी संशोधन केले. नोबेल पारितोषिकासारखे आंतरराष्ट्रीय पारितोषिक त्यांना मिळाले. विज्ञानाप्रमाणेच त्यांनी संगीतविषयक संशोधनकार्य केले. लोकोत्तर प्रतिभेच्या या शास्त्रज्ञाच्या चरित्राची थोडक्यात ओळख करून घ्यावी, एवढाच माफक उद्देश या चरित्रलेखनामागे आहे.
Binding | Paperback |
---|---|
Language | Marathi |
Pages | |
Weight | |
Author |
श्रीराम शिधये |