आपल्या देशात असे काही धडपडे, खटपटी करणारे विद्यार्थी आहेत की ज्यांनी आपल्याजवळ असलेल्या वैज्ञानिक ज्ञानाला कल्पकतेची जोड देऊन अक्षरश: आश्चर्यजनक गोष्टी करून दाखवल्या आहेत. दैनंदिन जीवनात भेडसावणाऱ्या समस्येकडे दुर्लक्ष न करता ती समस्या दूर कशी होईल, याचा जणू पिच्छा त्यांनी पुरवला आहे. निरीक्षण क्षमता, कल्पकता आणि चिकाटी ह्या गुणांच्या जोरावर त्यांनी एखाद्या शास्त्रज्ञाप्रमाणे संशोधन केलं आहे आणि समस्या सोडवण्यासाठी समाजाला एक दिशा दाखवली आहे. अशाच काही विद्यार्थ्यांची आणि त्यांनी साकारलेल्या ‘हटके’ कल्पनांची ही ओळख…
Reviews
There are no reviews yet.