Look Inside

मला भावलेले गुलजार

(1 customer review)

हे लेखन काय नाही ? हे गुलजारचे चरित्र नाही . ही गुलजारच्या साहित्याची समीक्षा नाही .मग हे लेखन आहे तरी काय ? फार काहीही नाही , तर गुलजारच्या कविता – कथा वाचताना , गीत – गझल ऐकताना , सिनेमा – मालिका बघताना , तुमच्या – माझ्या सारख्या सामान्य माणसांच्या मनात दाटून येणाऱ्या आठवणी किंवा उमटत राहणारे पडसाद यांचे अधूरे – अपुरे असे हे प्रतिबिंब आहे .

175.00

SKU: 088e3e075bac Categories: ,

हे लेखन काय नाही ? हे गुलजारचे चरित्र नाही .  ही गुलजारच्या साहित्याची समीक्षा नाही .  व्याकरणाचे नियम , सौंदर्यशास्त्राचे सिद्धांत , ऐतिहासिक आणि वर्तमानकालीन वस्तुस्थिती यांच्या निकषांवर केलेले मुल्यमापन तर नाहीच नाही . मग हे लेखन आहे तरी काय ? फार काहीही नाही , तर गुलजारच्या कविता – कथा वाचताना , गीत – गझल ऐकताना , सिनेमा – मालिका बघताना , तुमच्या – माझ्या सारख्या सामान्य माणसांच्या मनात दाटून येणाऱ्या आठवणी किंवा उमटत राहणारे पडसाद यांचे अधूरे – अपुरे असे हे प्रतिबिंब आहे .  साहजिकच ही गुलजार च्या साहित्याची प्रसिद्धी – प्रकाशित नुसार क्रमवारीनुसार अनुक्रमणिका नाही . नाहीतरी आठवणी किंवा पडसाद यांना कुठे अनुक्रमणिका असते ? यात गुलजारचे शब्द महत्वाचे आहेतच ! पण त्याचबरोबर मला त्याचा उमगणारा , थोडे जास्तच स्पष्ट सांगायच तर ते शब्द वाचताना – ऐकताना माझ्या मनात त्या क्षणांना जाग्या होणाऱ्या भावना शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न आहे .  कदाचित मूळ कथा , गोष्ट , बाब सांगताना प्रत्यक्ष गुलजार ला अगदी पार वेगळेच असे काहीतरी सांगायच असेल ! ! !   . . . पण मला भावलेला , भावणारा असा हा गुलजार ! ! ! !

Binding

Paperback

Language

Marathi

Pages

Author

चन्द्रशेखर टिळक

Publisher

Moraya Prakashan

1 review for मला भावलेले गुलजार

  1. Alok Mohan Tamhankar

    चंद्रशेखर टिळक यांचे पुस्तक “मला भावलेले गुलजार”. मी सहसा मराठी पुस्तक वाचत नाही , कारण काही खास नाही, सवय नाही मराठी पुस्तक वाचायची , एवढंच.

    सरांनी मला हे पुस्तक मी आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात दिलं होत. कार्यक्रम होता कवी वैभव जोशी आणि कवी किशोर कदम (सौमित्र) यांचा. त्याला ही बरेच महिने होऊन गेले. मधल्या काळात खूप पुस्तक वाचून झाली. आता या pandemic madhe खजिना शोधत असताना अचानक हे समोर दिसल… आणि वाटल : siranchi सगळी पुस्तकं financial / ani budget var astat. उत्सुकता होती म्हणून वाचायला घेतल.

    गुलजार यांनी लिहिली गाणी, कविता मी काय, आपण सगळेच ऐकत आलो आहोत. पण त्यांच्या बद्दल चे विविध पैलू कधी समजले न्हवते, किव्वा कधी तसा प्रयत्न केला न्हवता अस म्हणू शकता.

    पुस्तक वाचायला घेतल आणि मी थक्क झालो. टिळक सरांनी खूप सध्या सरळ भाषेत (माझ्यासाठी हे खूप महत्त्वाचं) गुलजार आपल्या समोर मांडलेत.

    गुलजार स्वतः ची जन्मतारीख कशी सांगतात एका कवितेत : मेरी चेसिस की तारीख आत्त्रहा अगस्त उन्नीस सौ चौतीस है।

    राविपार लेख वाचताना नुकताच एक पुस्तक वाचलं होत *freedom at midnight*, त्यातले संदर्भ आठवले.

    तिन्हीसांजा – तर अगदी आपली रोजची संध्याकाळ, आठवणी आणि पुढच्या लेखा मध्ये तर सरांनी शेअर मार्केट (त्यांचा आवडता विषय आणि माझा हि) म्हणजे “येह दिन भी गुजर जायेगा” एवढं सोप्प करून सांगितलं.
    सध्या ONLINE पुस्तकं वाचताना बरेच जण. त्यावर गुलजार म्हणतात “किताबे मांगने, गिरने, उठाने के बहाने रिश्ते बनते थे उनका क्या होगा”

    अजून खूप काही लिहिण्यासारखं , सांगण्यासारख आहे, पण त्या पेक्षा स्वतः पुस्तक वाचून गुलजार ना समजून घेण्यात वेगळीच मज्जा आणि आनंद आहे.

    पवन वर्मा म्हणतात ते अगदी खरं आहे “Gulzaar is continuous process of literary evolution”

    टिळक sir, तुमच्यामुळे आज भरपूर गुलजार समजले आणि खूप नवीन शब्द सुद्धा. गुलजार आता अजून अजून वाचावे वाटतात आणि ही सवय मला लागली ह्याच संपूर्ण श्रेय फक्त तुम्हाला आणि गुलजार साहेबांना “आदतें भी अजीब सी होती है” 🙂

    अलोक ताम्हनकर
    डोंबिवली
    ९६१९९३६७७७

Add a review