हे लेखन काय नाही ? हे गुलजारचे चरित्र नाही . ही गुलजारच्या साहित्याची समीक्षा नाही . व्याकरणाचे नियम , सौंदर्यशास्त्राचे सिद्धांत , ऐतिहासिक आणि वर्तमानकालीन वस्तुस्थिती यांच्या निकषांवर केलेले मुल्यमापन तर नाहीच नाही . मग हे लेखन आहे तरी काय ? फार काहीही नाही , तर गुलजारच्या कविता – कथा वाचताना , गीत – गझल ऐकताना , सिनेमा – मालिका बघताना , तुमच्या – माझ्या सारख्या सामान्य माणसांच्या मनात दाटून येणाऱ्या आठवणी किंवा उमटत राहणारे पडसाद यांचे अधूरे – अपुरे असे हे प्रतिबिंब आहे . साहजिकच ही गुलजार च्या साहित्याची प्रसिद्धी – प्रकाशित नुसार क्रमवारीनुसार अनुक्रमणिका नाही . नाहीतरी आठवणी किंवा पडसाद यांना कुठे अनुक्रमणिका असते ? यात गुलजारचे शब्द महत्वाचे आहेतच ! पण त्याचबरोबर मला त्याचा उमगणारा , थोडे जास्तच स्पष्ट सांगायच तर ते शब्द वाचताना – ऐकताना माझ्या मनात त्या क्षणांना जाग्या होणाऱ्या भावना शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न आहे . कदाचित मूळ कथा , गोष्ट , बाब सांगताना प्रत्यक्ष गुलजार ला अगदी पार वेगळेच असे काहीतरी सांगायच असेल ! ! ! . . . पण मला भावलेला , भावणारा असा हा गुलजार ! ! ! !
You are previewing: मला भावलेले गुलजार

मला भावलेले गुलजार
Binding | Paperback |
---|---|
Language | Marathi |
Pages | |
Author |
चन्द्रशेखर टिळक |
Publisher |
Moraya Prakashan |
Useful Reviews

Related Products
-
जगद्गुरु श्रीमद् शंकराचार्य₹60.00
-
-
लता मंगेशकर :संगीत लेणे₹25.00
-
-
नामरूपातीत₹100.00
मला भावलेले गुलजार
हे लेखन काय नाही ? हे गुलजारचे चरित्र नाही . ही गुलजारच्या साहित्याची समीक्षा नाही .मग हे लेखन आहे तरी काय ? फार काहीही नाही , तर गुलजारच्या कविता – कथा वाचताना , गीत – गझल ऐकताना , सिनेमा – मालिका बघताना , तुमच्या – माझ्या सारख्या सामान्य माणसांच्या मनात दाटून येणाऱ्या आठवणी किंवा उमटत राहणारे पडसाद यांचे अधूरे – अपुरे असे हे प्रतिबिंब आहे .
₹200.00
Binding | Paperback |
---|---|
Language | Marathi |
Pages | |
Author |
चन्द्रशेखर टिळक |
Publisher |
Moraya Prakashan |

चन्द्रशेखर टिळक
26 May 1960• निवृत्त कार्यकारी उपाध्यक्ष, एनएसडीएल समूह.
• एनएसडीएल, सेबी, मुंबई शेअरबाजार अशा भारतीय गुंतवणूक क्षेत्रातील नामांकित संस्थात ३२ वर्षांहून जास्त काळ उच्चपदस्थ अधिकारी.
• एकूण ४० वर्षे वित्तीय सेवा क्षेत्रात कार्यरत.
• देशांतील अनेक नामवंत शिक्षण-प्रशिक्षण संस्थात मानद व्याख्यता आणि त्यांच्या अनेक समित्यांत सभासद.
• विविध आर्थिक व गुंतवणुक विषयांवर देशभरात ३५०० व्याख्याने व इतर सर्व विषय मिळून आजपर्यंत ४५०० हून जास्त व्याख्याने.
• आजपर्यंत २८ पुस्तकें आणि ३२०० हून जास्त लेख प्रसिद्ध.
• १९८८ सालापासून सातत्याने अर्थसंकल्प विश्लेषण. २०२३ साली कै. मा. श्री. नानी पालखीवाला यांचा याआधीचा याबाबतचा विक्रम पार.
• आर्थिक विषयांवरील पुस्तक, लेख, भाषणे याबद्दल तीन माजी पंतप्रधान (अटलबिहारी वाजपेयी, नरसिंह राव, डॉ. मनमोहनसिंग) यांचे विशेष निमंत्रण व प्रत्यक्ष भेटीत प्रदीर्घ चर्चा.
• आधी लेख व नंतर ‘मला भावलेले गुलजार’ या पुस्तकाबद्दल स्वतः गुलजार यांच्याकडून प्रशंसा अनेक नामवंत पुरस्कारांनी सन्मानित.
आजपर्यंत प्रकाशित झालेल्या २८ पुस्तकांचा तपशील....
गुंतवणूक विषयक
१. शेअर ललित - गुंतवणूक विषयक वेगळ्या धाटणीचा डिसेंबर २०२२, मध्ये प्रकाशित झालेला लेखसंग्रह, मोरया प्रकाशन.
२. गुंतवणूक पंचायतन, राजहंस प्रकाशन, सध्या १४ वी आवृत्ती सुरू.
३. मार्केट मेकर्स, राजहंस प्रकाशन, तिसरी आवृत्ती सुरू, मसाप पुरस्कार विजेते पुस्तक.
४. गुंतवणूक गुरु(*)
५. गुंतवणूक तुमचीही माझीही(*)
आर्थिक
६. अर्थानुभुती - अर्थ विषयक भाषणांचा संग्रह, संवेदना प्रकाशन.
७. मोदी अर्थकारण : नीती आणि रणनीती, सध्या दुसरी आवृत्ती सुरू, मोरया प्रकाशन.
८. अर्थसंकल्प, पाचवी आवृत्ती, मैत्रेय प्रकाशन(*)
९. अर्थानुभव, पाचवी आवृत्ती, मैत्रेय प्रकाशन(*)
१०. अर्थसंकल्प (*)
११. The Budgetary Measures ....Thinkline (*)
ललित लेख
१२. मला भावलेले गुलजार- स्वतः गुलजार यांनी गौरवलेले पुस्तक, सध्या दुसरी आवृत्ती सुरू, मोरया प्रकाशन
१३. शब्द-शेखरी जानेवारी २०२३ मध्ये प्रकाशित, मोरया प्रकाशन.
प्रवास वर्णन ( जरा हटके)
१४. केल्याने देशाटन, सध्या दुसरी आवृत्ती सुरू, मोरया प्रकाशन
कथा - संग्रह
१५. स्नेहज्योत, नोव्हेंबर २०२२ मधे प्रकाशित, मोरया प्रकाशन
१६. मनापासून, संवेदना प्रकाशन
१७. भावमग्न, संवेदना प्रकाशन
१८. तरतम, संवेदना प्रकाशन
१९. अर्थस्वर, संवेदना प्रकाशन
२०. जन्मझूला, संवेदना प्रकाशन
२१. मल्हार मनाचा, दुसरी आवृत्ती, मोरया प्रकाशन
२२. मनातलं मनातच, दुसरी आवृत्ती, कौशिक प्रकाशन(*)
कविता - संग्रह
२३. भावतरंग, मोरया प्रकाशन(*)
२४. थेंब थेंब आयुष्य, संवेदना प्रकाशन(*)
२५. वही आयुष्याची, संवेदना प्रकाशन(*)
२६. मनरंगी ... संवेदना प्रकाशन(*)
२७. लगोरी ... संवेदना प्रकाशन(*)
२८. अस्तित्व .... संवेदना प्रकाशन(*)
*आता विक्रीसाठी उपलब्ध नाहीत.
1 review for मला भावलेले गुलजार
-
Rated 5 out of 5
Alok Mohan Tamhankar –
चंद्रशेखर टिळक यांचे पुस्तक “मला भावलेले गुलजार”. मी सहसा मराठी पुस्तक वाचत नाही , कारण काही खास नाही, सवय नाही मराठी पुस्तक वाचायची , एवढंच.
सरांनी मला हे पुस्तक मी आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात दिलं होत. कार्यक्रम होता कवी वैभव जोशी आणि कवी किशोर कदम (सौमित्र) यांचा. त्याला ही बरेच महिने होऊन गेले. मधल्या काळात खूप पुस्तक वाचून झाली. आता या pandemic madhe खजिना शोधत असताना अचानक हे समोर दिसल… आणि वाटल : siranchi सगळी पुस्तकं financial / ani budget var astat. उत्सुकता होती म्हणून वाचायला घेतल.
गुलजार यांनी लिहिली गाणी, कविता मी काय, आपण सगळेच ऐकत आलो आहोत. पण त्यांच्या बद्दल चे विविध पैलू कधी समजले न्हवते, किव्वा कधी तसा प्रयत्न केला न्हवता अस म्हणू शकता.
पुस्तक वाचायला घेतल आणि मी थक्क झालो. टिळक सरांनी खूप सध्या सरळ भाषेत (माझ्यासाठी हे खूप महत्त्वाचं) गुलजार आपल्या समोर मांडलेत.
गुलजार स्वतः ची जन्मतारीख कशी सांगतात एका कवितेत : मेरी चेसिस की तारीख आत्त्रहा अगस्त उन्नीस सौ चौतीस है।
राविपार लेख वाचताना नुकताच एक पुस्तक वाचलं होत *freedom at midnight*, त्यातले संदर्भ आठवले.
तिन्हीसांजा – तर अगदी आपली रोजची संध्याकाळ, आठवणी आणि पुढच्या लेखा मध्ये तर सरांनी शेअर मार्केट (त्यांचा आवडता विषय आणि माझा हि) म्हणजे “येह दिन भी गुजर जायेगा” एवढं सोप्प करून सांगितलं.
सध्या ONLINE पुस्तकं वाचताना बरेच जण. त्यावर गुलजार म्हणतात “किताबे मांगने, गिरने, उठाने के बहाने रिश्ते बनते थे उनका क्या होगा”अजून खूप काही लिहिण्यासारखं , सांगण्यासारख आहे, पण त्या पेक्षा स्वतः पुस्तक वाचून गुलजार ना समजून घेण्यात वेगळीच मज्जा आणि आनंद आहे.
पवन वर्मा म्हणतात ते अगदी खरं आहे “Gulzaar is continuous process of literary evolution”
टिळक sir, तुमच्यामुळे आज भरपूर गुलजार समजले आणि खूप नवीन शब्द सुद्धा. गुलजार आता अजून अजून वाचावे वाटतात आणि ही सवय मला लागली ह्याच संपूर्ण श्रेय फक्त तुम्हाला आणि गुलजार साहेबांना “आदतें भी अजीब सी होती है”
अलोक ताम्हनकर
डोंबिवली
९६१९९३६७७७
Add a review Cancel reply
You must be logged in to post a review.
Alok Mohan Tamhankar –
चंद्रशेखर टिळक यांचे पुस्तक “मला भावलेले गुलजार”. मी सहसा मराठी पुस्तक वाचत नाही , कारण काही खास नाही, सवय नाही मराठी पुस्तक वाचायची , एवढंच.
सरांनी मला हे पुस्तक मी आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात दिलं होत. कार्यक्रम होता कवी वैभव जोशी आणि कवी किशोर कदम (सौमित्र) यांचा. त्याला ही बरेच महिने होऊन गेले. मधल्या काळात खूप पुस्तक वाचून झाली. आता या pandemic madhe खजिना शोधत असताना अचानक हे समोर दिसल… आणि वाटल : siranchi सगळी पुस्तकं financial / ani budget var astat. उत्सुकता होती म्हणून वाचायला घेतल.
गुलजार यांनी लिहिली गाणी, कविता मी काय, आपण सगळेच ऐकत आलो आहोत. पण त्यांच्या बद्दल चे विविध पैलू कधी समजले न्हवते, किव्वा कधी तसा प्रयत्न केला न्हवता अस म्हणू शकता.
पुस्तक वाचायला घेतल आणि मी थक्क झालो. टिळक सरांनी खूप सध्या सरळ भाषेत (माझ्यासाठी हे खूप महत्त्वाचं) गुलजार आपल्या समोर मांडलेत.
गुलजार स्वतः ची जन्मतारीख कशी सांगतात एका कवितेत : मेरी चेसिस की तारीख आत्त्रहा अगस्त उन्नीस सौ चौतीस है।
राविपार लेख वाचताना नुकताच एक पुस्तक वाचलं होत *freedom at midnight*, त्यातले संदर्भ आठवले.
तिन्हीसांजा – तर अगदी आपली रोजची संध्याकाळ, आठवणी आणि पुढच्या लेखा मध्ये तर सरांनी शेअर मार्केट (त्यांचा आवडता विषय आणि माझा हि) म्हणजे “येह दिन भी गुजर जायेगा” एवढं सोप्प करून सांगितलं.
सध्या ONLINE पुस्तकं वाचताना बरेच जण. त्यावर गुलजार म्हणतात “किताबे मांगने, गिरने, उठाने के बहाने रिश्ते बनते थे उनका क्या होगा”
अजून खूप काही लिहिण्यासारखं , सांगण्यासारख आहे, पण त्या पेक्षा स्वतः पुस्तक वाचून गुलजार ना समजून घेण्यात वेगळीच मज्जा आणि आनंद आहे.