Biography

Author Picture

चन्द्रशेखर टिळक

26 May 1960

• निवृत्त कार्यकारी उपाध्यक्ष, एनएसडीएल समूह.
• एनएसडीएल, सेबी, मुंबई शेअरबाजार अशा भारतीय गुंतवणूक क्षेत्रातील नामांकित संस्थात ३२ वर्षांहून जास्त काळ उच्चपदस्थ अधिकारी.
• एकूण ४० वर्षे वित्तीय सेवा क्षेत्रात कार्यरत.
• देशांतील अनेक नामवंत शिक्षण-प्रशिक्षण संस्थात मानद व्याख्यता आणि त्यांच्या अनेक समित्यांत सभासद.
• विविध आर्थिक व गुंतवणुक विषयांवर देशभरात ३५०० व्याख्याने व इतर सर्व विषय मिळून आजपर्यंत ४५०० हून जास्त व्याख्याने.
• आजपर्यंत २८ पुस्तकें आणि ३२०० हून जास्त लेख प्रसिद्ध.
• १९८८ सालापासून सातत्याने अर्थसंकल्प विश्लेषण. २०२३ साली कै. मा. श्री. नानी पालखीवाला यांचा याआधीचा याबाबतचा विक्रम पार.
• आर्थिक विषयांवरील पुस्तक, लेख, भाषणे याबद्दल तीन माजी पंतप्रधान (अटलबिहारी वाजपेयी, नरसिंह राव, डॉ. मनमोहनसिंग) यांचे विशेष निमंत्रण व प्रत्यक्ष भेटीत प्रदीर्घ चर्चा.
• आधी लेख व नंतर ‘मला भावलेले गुलजार’ या पुस्तकाबद्दल स्वतः गुलजार यांच्याकडून प्रशंसा अनेक नामवंत पुरस्कारांनी सन्मानित.

आजपर्यंत प्रकाशित झालेल्या २८ पुस्तकांचा तपशील....
गुंतवणूक विषयक
१. शेअर ललित - गुंतवणूक विषयक वेगळ्या धाटणीचा डिसेंबर २०२२, मध्ये प्रकाशित झालेला लेखसंग्रह, मोरया प्रकाशन.
२. गुंतवणूक पंचायतन, राजहंस प्रकाशन, सध्या १४ वी आवृत्ती सुरू.
३. मार्केट मेकर्स, राजहंस प्रकाशन, तिसरी आवृत्ती सुरू, मसाप पुरस्कार विजेते पुस्तक.
४. गुंतवणूक गुरु(*)
५. गुंतवणूक तुमचीही माझीही(*)
आर्थिक
६. अर्थानुभुती - अर्थ विषयक भाषणांचा संग्रह, संवेदना प्रकाशन.
७. मोदी अर्थकारण : नीती आणि रणनीती, सध्या दुसरी आवृत्ती सुरू, मोरया प्रकाशन.
८. अर्थसंकल्प, पाचवी आवृत्ती, मैत्रेय प्रकाशन(*)
९. अर्थानुभव, पाचवी आवृत्ती, मैत्रेय प्रकाशन(*)
१०. अर्थसंकल्प (*)
११. The Budgetary Measures ....Thinkline (*)
ललित लेख
१२. मला भावलेले गुलजार- स्वतः गुलजार यांनी गौरवलेले पुस्तक, सध्या दुसरी आवृत्ती सुरू, मोरया प्रकाशन
१३. शब्द-शेखरी जानेवारी २०२३ मध्ये प्रकाशित, मोरया प्रकाशन.
प्रवास वर्णन ( जरा हटके)
१४. केल्याने देशाटन, सध्या दुसरी आवृत्ती सुरू, मोरया प्रकाशन
कथा - संग्रह
१५. स्नेहज्योत, नोव्हेंबर २०२२ मधे प्रकाशित, मोरया प्रकाशन
१६. मनापासून, संवेदना प्रकाशन
१७. भावमग्न, संवेदना प्रकाशन
१८. तरतम, संवेदना प्रकाशन
१९. अर्थस्वर, संवेदना प्रकाशन
२०. जन्मझूला, संवेदना प्रकाशन
२१. मल्हार मनाचा, दुसरी आवृत्ती, मोरया प्रकाशन
२२. मनातलं मनातच, दुसरी आवृत्ती, कौशिक प्रकाशन(*)
कविता - संग्रह
२३. भावतरंग, मोरया प्रकाशन(*)
२४. थेंब थेंब आयुष्य, संवेदना प्रकाशन(*)
२५. वही आयुष्याची, संवेदना प्रकाशन(*)
२६. मनरंगी ... संवेदना प्रकाशन(*)
२७. लगोरी ... संवेदना प्रकाशन(*)
२८. अस्तित्व .... संवेदना प्रकाशन(*)

*आता विक्रीसाठी उपलब्ध नाहीत.