Look Inside

सुभाष बावनी – नेताजी सुभाषचंद्र बोस यांची ललित क्रांतिकथा

५२ लेखांमधून ओघवत्या शैलीतून उलगडत जाणारी भारतमातेच्या पराक्रमी सुपुत्राची विलक्षण चरित्रगाथा.. 
स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करताना हे अनमोल असे स्वातंत्र्य आपल्या  भारत देशाला ज्या क्रांतिकारकांच्या बलिदानामुळे मिळाले त्यांचे स्मरण करणे अत्यंत आवश्यक आहे.नुसते स्मरणच नव्हे तर क्रांतिकारकांच्या असामान्य अशा देशभक्तीची आणि पराक्रमाची कथा वारंवार सर्वांसमोर मांडली पाहिजे आणि म्हणूनच पराक्रमदिवस म्हणून ज्या अतुलनीय योद्ध्याची १२५ वी जयंती आपण अभिमानाने साजरी करत आहोत असे नेताजी सुभाषचंद्र बोस यांची
लेखक अंबरीष पुंडलीक यांनी अभ्यासपूर्ण पद्धतीने पण ओघवत्या ललित शैलीतून उलगडलेली ही चरित्रगाथा सुभाषबावनी 
या पुस्तकाचे प्रकाशन, नेताजी सुभाष चंद्र बोस यांची १२५ व्या  जयंती निमित्ताने , २३ जानेवारी २०२२ ला झाले. 
नेताजींच्या चरित्रातील विलक्षण पैलू वाचकांसमोर मांडावेत या हेतूने त्यांनी २३ जानेवारी २०२१ ला सुरु केलेल्या ५२ लेखांच्या या लेखमालेला वाचकांनी अल्पावधीतच उदंड प्रतिसाद दिला आहे. देशभक्ती आणि शौर्य जागृत करणाऱ्या अशा लेखनाचे आपण मराठी वाचक मनापासून स्वागत करता आणि त्याचा प्रसार करण्यास स्वतः तत्पर असता याची अनुभूती आम्हाला यावेळी ही नक्की येईल अशी खात्री आहे. 

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “सुभाष बावनी – नेताजी सुभाषचंद्र बोस यांची ललित क्रांतिकथा”