खग्रास सूर्यग्रहण हे एक स्वर्गीय नाट्य आहे. विलक्षण योगायोग हेच या नाट्याचे कारण आहे. केवळ काही मिनिटांचा तो एक नेत्रदीपक खेळ आहे. त्याचा साक्षात अनुभव हा एक मोलाचा क्षण आहे. चंद्रसूर्य बिंबाच्या मिलाफाचा क्षण जवळ आला की, आकाशात एक अलौकिक आंगठी झळाळते.भूपृष्ठावर सावल्यांच्या लहरींचे नर्तन होऊ लागते. आणि क्षणार्धात एकाएकी सूर्यबिंब अदृश्य होतो. त्याचवेळी सूर्याचे तेजस्वी किरीट प्रगट होतो. हे झाले खग्रास सूर्यग्रहणाचे वरवरचे वर्णन! पण या चित्तवेधक प्रसंगामागे एक शास्त्र आहे. खग्रास सुर्याग्रहानाचे गणित जरा अवघडच आहे. तरीही भूमितीच्या साध्या साध्या आकृत्यांनी , आलेखांनी आणि सोप्या सोप्या गणिती सूत्रांनी सुर्याग्रहानाचे विज्ञान उलगडता येते. त्या दृष्टीने केलेला एक प्रयत्न, हेच या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे.
Reviews
There are no reviews yet.