महात्मा गांधींनी स्वातंत्र्याच्या राजकारणात अहिंसेला महत्वाचे स्थान दिले आणि त्यांच्याच नेतृत्वाखाली देशाला स्वातंत्र्य मिळाले, हे जरी खरे असले तरी महात्मा गांधींच्या पूर्वी व त्यांच्या काळात देशात जे क्रांतिप्रयत्न झाले ते सर्व चुकीचे होते किंवा निरर्थक होते असे नाही. सुभाषचंद्र बोस यांची आझाद हिंद सेना, तसेच क्रांतिकारकांच्या अनेक क्रांतिसंघटना यांनी जे प्रयत्न केले त्यांचा स्वातंत्र्यप्राप्तीत निश्चित वाटा आहे. क्रांतिकारकांमध्ये सूर्याप्रमाणे तळपणारे एक व्यक्तिमत्व म्हणजे शहीद भगतसिंग होत. ‘मृत्यूला न भिणारे शूर लोक जगात पुष्कळ आढळतात; नाही असे नाही पण मृत्युच्या जबड्यात उघड्या डोळ्यांनी हसत हसत प्रवेश करणारे वीर ह्यात किती सापडतील? मानवी जीवनातील उच्चत्तम मूल्यांसाठी आपल्या प्राणांचाही होम करणारे मृत्युंजय हि मानावातेह्ची अमर भूषणे होत. असे अनेक मृत्युंजय ह्या भारतात होऊन गेले म्हणूनच पारतंत्र्यामधून इतक्या लवकर त्याची मुक्तता झाली.’ साहित्यसम्राट आचार्य अत्रे यांचे क्रांतीकाराकांविषयीचे हे गौरवद्गार क्रांतिवीर भगतसिंग आणि त्यांचे साथीदार यांना तंतोतंत लागू पडतात.
क्रांतिवीर भगतसिंह
क्रांतिकारकांमध्ये सूर्याप्रमाणे तळपणारे एक व्यक्तिमत्व म्हणजे शहीद भगतसिंग होत. ‘मृत्यूला न भिणारे शूर लोक जगात पुष्कळ आढळतात; नाही असे नाही पण मृत्युच्या जबड्यात उघड्या डोळ्यांनी हसत हसत प्रवेश करणारे वीर ह्यात किती सापडतील? साहित्यसम्राट आचार्य अत्रे यांचे क्रांतीकाराकांविषयीचे हे गौरवद्गार क्रांतिवीर भगतसिंग आणि त्यांचे साथीदार यांना तंतोतंत लागू पडतात.
Reviews
There are no reviews yet.