ऐक ज्ञानाचे लक्षण| ज्ञान म्हणिजे आत्मज्ञान| पाहावे आपणासी आपण| या नाव ज्ञान||५|६|१|| जेथे दृष्य प्रकृती सारे| पंचभूतिक वोसरे| समूळ व्दैत निवारे| या नाव ज्ञान||५|६|२|| श्रीमद् ग्रंथराज दासबोधामध्ये सुमारे ४० ते ४५ समासात ज्ञानमार्गाचे विवरण आहे. हे समास दासबोधात वेगवेगळ्या दशकात विखुरलेले आहेत. प्रस्तुत ग्रंथात या समासांची एकत्रित चर्चा केली असून पंचीकरण, तत्वझाडा, माया-ब्रम्ह, दृष्यनिरसन, अंतःकरण पंचक, ज्ञानेंद्रिय, कर्मेद्रिय, चत्वार देह, शब्दज्ञान, अपरोक्षानुभूती,आत्मनिवेदन, अव्दैतबोध या विविध संकल्पना व्यावहारिक उदाहरणासह स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे.
Reviews
There are no reviews yet.