भारतातील पहिल्या स्त्री शिक्षिका आहेत- सावित्रीबाई ज्योतिबा फुले.फुलेकालीन समाज हा आर्थिक,सामाजिक,सांकृतिक आणि राजकीय आशा सर्व दृष्टींनी गुलामगिरीत होता.या गुलामीच्या बेड्या तोडायच्या तर त्यांवर रामबाण उपाय-हत्यार म्हणजे विद्या, हे ज्योतिबांनी अचूकपणे ओळखले होते आणि म्हणूनच ज्योतिबा गोविंदराव फुले यांनी पुणे येथे १ जानेवारी १८४८ मध्ये बुधवार पेठेतील भिडे यांच्या वाड्यात,मुलींची पहिली स्गाका स्य्र्य जेकू-शाळा काढली.त्या अगोदर ज्योतिबांच्या शेतावरील आंब्याच्या झाडाखाली भरविलेल्या सुरवातीच्या शाळेतील दोन विद्यार्थिनी होत्या. ज्योतिबांची पत्नी सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबांची मावसबहीण सगुणाबाई क्षीरसागर.शेतातील माती ही पाटीआणि झाडाच्या फांदीच्या छोट्या काटक्या ही होती लेखणी. शेतातील झाडे, फुलझाडे इ. नावे लिहायची. दिवसभरातील प्रसंगावर वाक्यरचना करायची. अशा पध्दतीने दोघी शिकल्या.स्त्रियांना शिक्षण दिल्यास अनर्थ ओढवेल असं वाटण्याचे ते दिवस होते. त्यामुळे समाजातील सर्व थोरांतील लोकांनीही त्यांच्या या स्त्री-शिक्षणास विरोध केला. पण जे कार्य अंतिमदृष्ट्या हितकारक आहे, चांगलं आहे,योग्य आहे ते कितीही विरोध झाला तरी करायचे, अशी जिद्द या दोघांमध्ये होती.
Ankush –
love it!
admin –
Love this Book! Love it