दासबोध चिंतनसार

वाचकांना दासबोधाच्या आधिक अभ्यासाकडे आपोआप प्रवृत्त करणारा असा सोपा व सुटसुटीत ग्रंथ !!

250.00

माझे सन्मित्र, ग्राहक चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते, प्रख्यात प्राणी वैद्य आणि अंतर्बाह्य समर्थचरणरत डॉ.विजय लाड यांच्या आकारदृष्ट्या लहान पण आशयदृष्ट्या महान ‘दासबोध चिंतन सार’ या ग्रंथाचे मी मनापासून स्वागत करतो.दासबोधातील प्रत्येक समासातील निवडक ओव्या घेऊन संपूर्ण समासाचा विषय नेमकेपणाने सारस्वरुपात स्पष्ट करण्याची हातोटी विजयरावांना विलक्षणपणे साधली आहे.अवघड समासातील तत्वविचार बारकाव्यांसह अधीक सोपे करुन त्यांनी सांगितले आहेत.वाचकांना दासबोधाच्या आधिक अभ्यासाकडे आपोआप प्रवृत्त करणारा असा सोपा व सुटसुटीत ग्रंथ दिल्याबद्दल लेखक डॉ. विजय लाड व प्रकाशक दिलीप महाजन या दोघांचेही मनःपूर्वक अभिनंदन.
डॉ. विजय लाडांचा हात असाच ‘लिहिता’ राहो हीच समर्थ चरणी प्रार्थना.
मधु नेने,
संपादक, सज्जनगड मासिक पत्रिका,सातारा.