फक्त मोदीच..
लोकसभा निवडणूकीच्या निमित्ताने मागील दहा वर्षांतील माझे हे तिसरे पुस्तक.
मोरया प्रकाशनातर्फेच प्रकाशित झालेल्या २०१४ तील ‘मोदीच का’ पुस्तकातील भाकित खरे ठरले.
नंतर पाच वर्षांनी २०१९ च्या लोकसभा निवडणूकीसाठीचे भाकित (पुस्तक-‘पुन्हा मोदीच का?)
हे भारतीय मतदारांनी पुन्हा एकदा खरे ठरवले.
हे पुस्तक येणाऱ्या लोकसभा निवडणूक निकालाचा अचूक आकडा सांगण्याबरोबरच असे आकडे कुठून येतात वा कशामुळे येतात, ते समजावण्यासाठीचे आहे.
म्हणून प्रस्तावनेतच मी निकालाविषयीचा माझा अंदाज सांगितला आहे. निवडणूका जिंकण्यासाठी काम करावे लागते. निवडणुकीतून जनतेकडून सत्तेचे वरदान मिळवताना,
सत्ता मिळाल्यास जनतेला अधिकाधिक सुखी कसे करता येईल असा विचार राजकीय पक्षांनी करणे अपेक्षित असते.यातून जनमानस कसे बदलत जाते,
याचा अभ्यास हा या पुस्तकाचा हेतू आहे.
भाऊ तोरसेकर
फक्त मोदीच
भाऊ तोरसेकर यांच्या अभ्यासपूर्ण राजकीय विश्लेषणातून २०२४ च्या लोकसभा निवडणूकीचा अंदाज घेणारे पुस्तक !!!
लोकसभा निवडणूक निकालाचे असे अंदाज सांगताना हे आकडे कुठून येतात वा कशामुळे येतात,याबद्दल चर्चा करणारे आणि त्यामागचा कार्यकारणभाव उलगडून दाखवणारे हे पुस्तक आहे.
Pages | |
---|---|
ISBN | 9789392269325 |
Language | मराठी |
Author |
भाऊ तोरसेकर |
Publisher |
Moraya Prakashan |
Reviews
There are no reviews yet.