Look Inside
Offer

श्री संत एकनाथ महाराज  कृत भावार्थ रामायण

मराठी भाषेच्या आरंभ काळापासून  निर्माण झालेल्या श्रीविठ्ठलाच्या भक्तिसंप्रदायात महत्वाचे कार्य करणाऱ्या संत एकनाथांनी ती परिपाठी सोडून मराठी भाषेत प्रथमच संपूर्ण रामकथा लिहिली .शांतीब्रह्म म्हणून ओळखले जाणारे एकनाथ महाराज वीररस प्रधान ग्रंथ निर्माण करताना म्हणतात –

सोडवाया देवांची बांदवडी । तोडावया नवग्रहांची बेडी ।उभावा  रामराज्याची गुढी ।आज्ञा धडफुडी तिन्ही लोकी ।।

‘भावार्थ रामायण’ ग्रंथाच्या ४० हजार ओव्यांची नवरसपूर्ण श्रीरामकथा सर्वांनी वाचावी म्हणून तर हा गद्य अनुवादाचा प्रपंच!

1,000.00 750.00

Ends in
00days
00hr
00min
00sec
Saving 25% Value 1,000.00 You Save 250.00
SKU: bf6f37e20906 Categories: ,

संत श्रीएकनाथमहाराजांनी पारमार्थिक ,धार्मिक ,सांस्कृतिक ,अशा जाणीवांबरोबरच तत्कालीन (१६ वे शतक) राजकीय परिस्थितीचे भानही ठेवले.त्यासाठी,मराठी माणसांच्या मनात स्वधार्माबरोबर स्वदेशाभीमान जागा करण्यासाठी नाथ महाराजांनी आपल्या आयुष्याच्या अखेरच्या टप्प्यात (नाथानी इ.स.१५९९ त समाधी घेतली) ‘भावार्थ रामायण ‘ हा क्रांतदर्शी ,प्रेरणादायी अपूर्व ग्रंथ निर्माण केला.मराठी भाषेच्या आरंभ काळापासून  निर्माण झालेल्या श्रीविठ्ठलाच्या भक्तिसंप्रदायात महत्वाचे कार्य करणाऱ्या संत एकनाथांनी ती परिपाठी सोडून मराठी भाषेत प्रथमच संपूर्ण रामकथा लिहिली .शांतीब्रह्म म्हणून ओळखले जाणारे एकनाथ महाराज वीररस प्रधान ग्रंथ निर्माण करताना म्हणतात -सोडवाया देवांची बांदवडी । तोडावया नवग्रहांची बेडी ।उभावा  रामराज्याची गुढी ।आज्ञा धडफुडी तिन्ही लोकी ।। श्रीरामोपासना ,बलोपासना आणि रामराज्य संकल्पना लगेच पुढच्या ४०-५० वर्षात महाराष्ट्रात समर्थ रामदास आणि श्री शिवराय यांच्या प्रयत्नांनी प्रत्यक्षात आल्या .हे नाथांचे द्रष्टेपण नव्हे काय ?स्वराज्य स्थापनेसाठी जनमानसात या ग्रंथानी  प्रेरणा निर्माण केली नसेल का? ‘भावार्थ रामायण’ग्रंथाच्या ४० हजार ओव्यांची नवरसपूर्ण श्रीरामकथा सर्वांनी वाचावी म्हणून तर हा गद्य अनुवादाचा प्रपंच!