शुक्रतारा या गाण्याला पूर्ण झालेली ५५ वर्षे, आजवर देशविदेशात मिळून ‘ शुक्रतारा ‘ या कार्यक्रमाचे २६०० प्रयोग,अतुल अरुण दाते यांनी या कार्यक्रमाचे केलेले आयोजन आणि अरुणजी दाते यांचे ८३ व्या वर्षात पदार्पण ,या निमित्ताने मोरया प्रकाशनने या मराठी भावसंगीतातील अढळ असणाऱ्या ‘ शुक्रताऱ्याचा ‘ सुरेल असा जीवनप्रवास मराठी रसिक वाचकांसमोर नव्या स्वरुपात प्रकाशित केला आहे .मराठी भावसंगीतातील ‘ शुक्रतारा ‘ असणारे ज्येष्ठ गायक श्री. अरुणजी दाते यांनी आपला ५५ वर्षांचा गायन प्रवास या पुस्तकात उलगडून दाखवला आहे. गायन क्षेत्रात पदार्पण करण्यापूर्वी आपल्या घरातील सांगीतिक पार्श्वभूमी , सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ गायकांचा, साहित्यिकांचा लाभलेला सहवास , आईवडिलांची कलासक्त ,सकारात्मक आणि माणूस जपण्याची शिकवण यासर्वांमुळे ते एक कलाकार व व्यक्ती म्हणून कसे घडत गेले , याचे फार सुंदर चित्रण त्यांनी या पुस्तकात केले आहे, यातून १९३४ नंतर ते १९९५ पर्यंतच्या कालावधीत प्रथम इंदौर ,मग मुंबई, ग्वाल्हेर येथील मराठी माणूस आणि संस्कृती यांचेही थोडेफार वर्णन येते. मराठी संगीत क्षेत्रात त्यावेळेस पासून सुप्रसिद्ध अशा अनेक गायक ,संगीतकार, वादक ,निवेदक आणि राजकीय व क्रीडा क्षेत्रातील अनेक मान्यवर व्यक्तींशी असलेला त्यांचा निकटचा स्नेह , त्यांच्या आठवणी अरुणजी दाते यांनी मनमोकळेपणाने वाचकांसमोर मांडल्या आहेत . गायनाच्या कार्यक्रमांच्या दौऱ्यांमध्ये देश विदेशात स्थायिक झालेली मराठी माणसे, त्यांचा मराठी भावगीतांना मिळालेला उत्तम प्रतिसाद,अनुभव हेही वाचकाला एका कलाकारच्या आयुष्याची सफर घडवून आणतात.कलाक्षेत्रात आवश्यक असणारी शिस्तबद्धता, नियोजन, सहकलाकारांविषयीचा आदर , आपुलकी ,मैत्री, स्पर्धेची ईर्ष्या न बाळगता कलेची केलेली सच्ची साधना ,या गोष्टी आजकालच्या कलाकारांनी यातून आत्मसात कराव्यात अशा आहेत . या लेखनाला आदरणीय पु.ल.देशपांडे यांची प्रस्तावना लाभली आहे . या सर्वांचे शब्दांकन सुलभा तेरणीकर यांनी केले आहे. अरुणजींच्या जीवनातील अनेक अविस्मरणीय क्षणांची उपलब्ध असलेली रंगीत छायाचित्रेही यात समाविष्ट केली आहेत.
शुक्रतारा अरुण दाते -५५ वर्षांची सांगीतिक वाटचाल
मराठी भावसंगीतातील ‘ शुक्रतारा ‘ असणारे ज्येष्ठ गायक श्री. अरुणजी दाते यांनी आपला ५५ वर्षांचा गायन प्रवास या पुस्तकात उलगडून दाखवला आहे. गायन क्षेत्रात पदार्पण करण्यापूर्वी आपल्या घरातील सांगीतिक पार्श्वभूमी, सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ गायकांचा, साहित्यिकांचा लाभलेला सहवास, आईवडिलांची कलासक्त ,सकारात्मक आणि माणूस जपण्याची शिकवण यासर्वांमुळे ते एक कलाकार व व्यक्ती म्हणून कसे घडत गेले,याचे फार सुंदर चित्रण त्यांनी या पुस्तकात केले आहे.
Binding | Paperback |
---|---|
Language | Marathi |
Pages | |
Weight | |
Author |
सुलभा तेरणीकर |