चिऊ- काऊ, भूभू आणि माऊ,पाऊस आणि वारा, सूर्यबाप्पा, चंदामामा आणि चांदण्या ,ढग ,इंद्रधनुष्य,झाडे ,वेली ,फळेफुले अन भाज्या -धान्ये ,फुलपाखरे ,समुद्र आणि मासे,जंगलातील वाघ आणि ससे ,एक न दोन निसर्गाची कित्ती कित्ती सुंदर रूपे ! मुले मोठी होऊ लागतात तसतशी या सर्वांशी मुलांची अनोखी मैत्री होती . आज सिमेंटच्या जंगलात राहणाऱ्या मुलांनाही अशा समृद्ध निसर्गाची ओळख राहावी म्हणून सर्व पालकवर्ग सातत्याने प्रयत्नशील असतो . मुलांच्या वाढीच्या वयात हे निसर्ग प्रेम टिकून राहावे आणि आज ऱ्हास पावत चाललेल्या निसर्गाचे जतन आणि संवर्धन व्हावे म्हणून हि निसर्ग बालगीते पुन्हा उपलब्ध करून देत आहोत . चल तर आपल्या मुलांना निसर्गाची एकसुंदर सफर घडवून आणूया चिमणगाणीच्या दुसऱ्या भागातून .
Reviews
There are no reviews yet.