भगीरथ, ज्ञानेश्वर,रामदास विवेकानंद सावरकर या अलौकिक महापुरुषांच्या जीवनावरील श्री. रवींद्र भट यांच्या ललित कादंबऱ्या मराठी साहित्यात लक्षणीय ठरल्या आहेत. या महापुरुषांचे जीवनादर्श आपल्या उगवत्या पिढीसमोर ठेवावेत या उद्देशाने खास बाल-कुमारांसाठी श्री. रवींद्र भट यांनी प्रस्तुत संस्कारमाला शब्दबद्ध केली आहे. भागिरथीचा श्रेष्ठ प्रयत्नवाद, ज्ञानेश्वरांचा माणूसधर्म, समर्थ रामदासांची राष्ट्रनिष्ठा, विवेकानंदांचा विश्वबंधुत्व विचार आणि सावरकरांची धगधगती देशप्रीती नव्या पिढीच्या मनी रुजायला हवी म्हणून शिक्षकांनी/पालकांनी संस्कारमालेतील गोष्टीरूप चरित्रे वाचावीत व मुलांकडून जाणीवपूर्वक वाचून घ्यावीतएक आदर्श माणूस घडविण्याच्या प्रक्रियेला अपोआप गती लाभेल.
Reviews
There are no reviews yet.