मन:शांती
हा ग्रंथ जर तुम्ही पूर्णपणे वाचलात ,त्यातील शिकवण तुम्ही काळजीपूर्वक आत्मसात केलीत ,
महाराष्ट्राचा महाजनादेश युती २२०+ की भाजपा १५०+?
आगामी विधानसभा निवडणूकीच्या निमित्ताने ताज्या घडामोडींचा परामर्श घेत महाराष्ट्राच्या पाच दशकातील राजकारणाचा उहापोह आणि त्यात भाजपा किंवा युतीच्या अजिंक्य होण्यामागचा इतिहास उलगडणारे पुस्तक!
मिशन वैष्णोदेवी-संघर्ष आणि उत्कर्ष
नवरात्रात माता वैष्णोदेवीवरील हे पुस्तक नक्की वाचा !! जम्मू आणि काश्मीरचे पूर्व राज्यपाल श्री.जगमोहन यांच्या Reforming Vaishno Devi and a case for Reformed,Reawakened and Enlightened Hinduism इंग्रजी ग्रंथाचा भावानुवाद डॉ.सच्चिदानंद शेवडे यांनी केला आहे तो मिशन वैष्णोदेवी-संघर्ष आणि उत्कर्ष या शीर्षकाने . या ग्रंथात राज्यपालांच्या मर्यादेत राहूनही जनोपयोगी कार्य कसे करता येते हे जगमोहन यांनी दाखवून दिले आहे.कतरा पासून वैष्णोदेवी पर्यंतचा परिसर व ते देवस्थान आपल्या अधिकारांचा उपयोग करून त्यांनी रम्य आणि देखणे बनविले आहे…त्यासाठीचा संघर्ष आणि त्याचे फळ म्हणजे आज त्या देवस्थानाचा झालेला उत्कर्ष त्यांनी या ग्रंथात मांडला आहे.या शिवाय त्यांना अभिप्रेत असलेल्या हिंदू धर्माची संकल्पना त्यांनी यात ग्रथित केली आहे.आज आपले पंतप्रधान नरेन्द्र मोदी प्रमुख देवस्थानांच्या विकासाच्या गोष्टी बोलत आहेत तेव्हा त्यांच्यासमोर रोलमॉडेल म्हणून वैष्णोदेवी संस्थान नक्कीच असेल.
मोदी अर्थकारण: नीती आणि रणनीती
मोदी सरकारच्या पहिल्या कालखंडात घेतलेल्या आर्थिक निर्णयांचा, उचललेल्या पावलांचा आढावा घेणारे,मोदी अर्थकारणाचे विश्लेषण
मोदीच का?..
मोदी म्हणजे विकास, भ्रष्टाचारमुक्त कारभार आणि ठामपणे निर्णय घेणारा नेता, अशा पायऱ्या मोदी चढत गेलेले आहेत.मोदींच का?….याचा ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर यांनी 2014 सालच्या लोकसभा निवडणूकीपूर्वी घेतलेला लेखाजोखा.
रक्तलांच्छन
फाळणीची रक्तकहाणी लोकांपर्यंत जावी या उद्देशाने लिहिलेली ऐतिहासिक विषयावरील कादंबरी..आज डॉ.सच्चिदानंद शेवडे हे आपल्या वाणीने आणि लेखणीने ओजस्वी भाषेत हिंदुत्वाचा पुरस्कार करणारे लेखक – प्रवचनकार म्हणून सुप्रसिद्ध आहेत.भारताची फाळणी आणि त्यामुळे वाट्याला आलेले भोग ,तो इतिहास ‘रक्तलांच्छन’ मधे सडेतोडपणे मांडला आहे.
राहुल विरचित महाभारतातला उफराटा घटोत्कच
राहुल गांधी हे कॉंग्रेसचे उपाध्यक्ष झाल्यापासून त्यांच्यामुळे कॉंग्रेसचा कसा र्हास होईल, त्याचे भाकित भाऊंनी सातत्याने केले होतेच. पण राहुल कॉंग्रेस अध्यक्ष झाल्यानंतर ते कॉंग्रेससोबत पुरोगामी पक्षांचाही कपाळमोक्ष घडवून आणणार; हे भाकित नुकत्याच संपलेल्या लोकसभा निवडणुकीने अचुक खरे ठरवले आहे. त्याचाच आलेख म्हणजे हे पुस्तक होय.
समर्थ रामदासांचे व्यवस्थापन
समर्थांच्या व्यवस्थापनावर तांबेकर यांनी इंग्रजीत मोठा ग्रंथ लिहिला आहे.