भाऊ तोरसेकर यांच्या अभ्यासपूर्ण राजकीय विश्लेषणातून २०२४ च्या लोकसभा निवडणूकीचा अंदाज घेणारे पुस्तक !!!
लोकसभा निवडणूक निकालाचे असे अंदाज सांगताना हे आकडे कुठून येतात वा कशामुळे येतात,याबद्दल चर्चा करणारे आणि त्यामागचा कार्यकारणभाव उलगडून दाखवणारे हे पुस्तक आहे.
२०३० साली भारतीय अर्थकारणाचे चित्र कसे असेल? कोणत्या गोष्टीमुळे मोठे बदल घडतील? आत्मनिर्भर भारत अभियान २.० या उद्दिष्ट प्राप्तीसाठी गेल्या काही वर्षात,विशेषत: गेल्या १० वर्षात घेतलेल्या काही पारंपारिक तसेच अपारंपारिकही निर्णयांची चर्चा करणारे पुस्तक !!
प.पू.स्वामी गोविंददेव गिरि महाराज हे आजच्या काळातील आद्य श्रीमद् शंकराचार्य, श्री समर्थ रामदास स्वामी आणि स्वामी विवेकानंद यांच्यासम क्षणोक्षणी राष्ट्राच्या हिताचा विचार करणारे आणि तो विचार प्रत्यक्ष कृतीत उतरवून पथदर्शी कार्य सातत्याने करत राहणारे असे ‘राष्ट्रयोगी’ आहेत..त्यांची ही जीवनगाथा आपल्या सर्वांना नित्य कार्यरत राहण्यासाठी ऊर्जा प्रदान करेल.
मराठी जनमानसावर अधिराज्य गाजवणाऱ्या दैवताविषयीच्या माहितीचे डोळस संकलन म्हणजे बाप्पा मोरया!
गणेशाचे अवतार,उपासना,व्रते आणि माहात्म्य सांगणारे,त्याविषयीच्या सर्व शंकांचे समाधान करणारे माहितीपूर्ण व संग्राह्य पुस्तक!