डॉ.सच्चिदानंद शेवडे आणि डॉ.परीक्षित शेवडे लिखित चार पुस्तकांचा संच विशेष व भरघोस सवलतीत
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त खास….
डॉ.सच्चिदानंद शेवडे आणि डॉ.परीक्षित शेवडे लिखित चार पुस्तकांचा संच विशेष व भरघोस सवलतीत..
दासबोधातील विवेक मोती
“विवेक” हा समर्थांच्या फार आवडीचा विषय आहे. प्रस्तुत पुस्तकामध्ये लेखक शिवराम सोनार यांनी, दासबोधातील “विवेक” विषयक ओव्या निवडून, त्यावर सोपे स्पष्टीकरण केले आहे. अश्या एकूण ‘विवेक’ विषयक ३५८ ओव्या आणि त्या वर आधारित भाष्य असे पुस्तकाचे स्वरूप आहे..
राष्ट्रयोगी प.पू.स्वामी गोविंददेव गिरि महाराज -चरित्र व कार्यदर्शन
प.पू.स्वामी गोविंददेव गिरि महाराज हे आजच्या काळातील आद्य श्रीमद् शंकराचार्य, श्री समर्थ रामदास स्वामी आणि स्वामी विवेकानंद यांच्यासम क्षणोक्षणी राष्ट्राच्या हिताचा विचार करणारे आणि तो विचार प्रत्यक्ष कृतीत उतरवून पथदर्शी कार्य सातत्याने करत राहणारे असे ‘राष्ट्रयोगी’ आहेत..त्यांची ही जीवनगाथा आपल्या सर्वांना नित्य कार्यरत राहण्यासाठी ऊर्जा प्रदान करेल.
सुभाष बावनी – नेताजी सुभाषचंद्र बोस यांची ललित क्रांतिकथा
अमोल ठेवा : हिंदू सण व संस्कार
वार्षिक सण,व्रत वैकल्ये यांची संपूर्ण माहिती देणारे मराठीतील लोकप्रिय पुस्तक
काश्मीर : धुमसते बर्फ
हा काश्मीरचे भूतपूर्व राज्यपाल ,माजी सनदी अधिकारी व माजी केंद्रीय मंत्री श्री. जगमोहन यांच्या मूळ My Frozen Turbulence in Kashmir या इंग्रजी ग्रंथाचा मराठी अनुवाद. हा अतिशय वेधक ग्रंथ, इतिहासाचा वेध घेत, ते जम्मू काश्मीर सारख्या अत्यंत संवेदनशील राज्याचे दोनदा राज्यपाल असताना घडलेल्या घटनांचं सखोल विश्लेषण सादर करतो आणि सांगतो काश्मीर हे अत्यंत खडतर आव्हान फक्त सुधारीत आणि परिष्कृत भारतच पेलू शकेल, असा भारत की ज्याच्यापाशी ‘उद्या’ चा वेध घेणारी दृष्टी आहे व वास्तवाचं भान ठेवून व्याहारिक उपाय योजण्याची जिद्द आहे.
बाप्पा मोरया
मराठी जनमानसावर अधिराज्य गाजवणाऱ्या दैवताविषयीच्या माहितीचे डोळस संकलन म्हणजे बाप्पा मोरया!
गणेशाचे अवतार,उपासना,व्रते आणि माहात्म्य सांगणारे,त्याविषयीच्या सर्व शंकांचे समाधान करणारे माहितीपूर्ण व संग्राह्य पुस्तक!
युगद्रष्टे छत्रपती शिवाजी महाराज
आजच्या बिकट परिस्थितीमध्ये भारतीय समाजासाठी अत्यंत प्रासंगिक व प्रेरणास्पद असणारे छत्रपती शिवाजी महाराज यांचे चरित्र !!