कर्मसिद्धांत

कर्म सिद्धांताप्रमाणे  मनुष्य हा आपल्या कर्माद्वारे घडलेला असतो.

90.00

SKU: b9370f595d36 Categories: , , ,

कर्म सिद्धांताप्रमाणे  मनुष्य हा आपल्या कर्माद्वारे घडलेला असतो. त्याची दु:खे व संकटे स्वकृत कर्माद्वारेच त्याने स्वत:वर ओढवून घेतलेली असतात. म्हणूनच प्रारब्धाला साहस, संयम आणि दैर्याने भोगून मोकळे होण्यातच विवेक आहे. मनुष्याने कर्मबंध आणि कर्म फळाच्या समस्त प्रक्रियेचे रहस्य जाणून घेतले  पाहिजे. तो जर कर्म कौशल्याच्या बळावर आणि शुभ कर्मांच्या आधारे वर्तमान सजगपणे जगला तर त्याचा भविष्यकाळ निश्चितपणे उज्जवलच राहील. कर्मसिद्धांत भाग्य वादी नसल्याने पुरुषार्थाद्वारे अशुभ कर्मांना शुभ कर्मात, दुर्भाग्याला सौभाग्यात आणि दुष्कृताला सुकृतात बदलता येईल. ‘जप- तप -दान-धर्म-सेवा -त्याग’ ह्यांच्या अखंड पालनाने कर्मबंध सैल होतील व आत्मज्ञान प्राप्त झाल्यावर ज्ञानाग्नित भस्म होतील. कर्मसिद्धांताच्या पालनाने मानसिक संतुलन राहील, कष्ट कमी जाणवतील आणि संकटे सहन करण्याची शक्ती मिळेल. आपले स्वत:चे जीवन उच्चतम पातळीवर नेण्याची शक्ती आपल्याजवळ असते. पुरुषार्थ योगे तिचा सुकर उपयोग करून शुभाकडून शुद्धतेकडे  जाण्याचा सतत प्रयत्न केल्यास मनुष्य हळू हळू बंधमुक्त होईल व मोक्ष गतीकडे वाटचाल करू लागेल. हे कसे होईल हे समजावून सांगण्यासाठीच हा कर्मग्रंथ!