“ऊँ नमोजी आद्या| वेदप्रतिपाद्या ||” अशा गणेशवंदनेने ज्ञानदेवांची वाक् सुधा एकापाठोपाठ एका अमृताचे बोल बोलू लागली. नेवासे गावाच्या देवालयात एका खांबाशी गावकऱ्यांनी बैठक तयार केली होती. तीवर ज्ञानदेव आणि त्यांची भावंडे बसत. मंद ज्योतीचा प्रकाश सर्वत्र आपले तेज पसरवत असे त्याचवेळी ज्ञानदेवांच्या ज्ञानशक्तीचाही प्रकाश सर्व श्रोत्यांच्या अंतरंगाला उजळून टाकत होता. भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेले गहन विचार हळुवारपणे सोप्या भाषेत आणि रसपूर्ण शैलीत निवेदन करताना प्रकट झालेले ज्ञानदेवांचे कौशल्य खरोखर अवर्णनीय होते श्रोते मंत्रमुग्ध झाले. ज्ञानदेवांच्या लोकशिक्षणाच्याध्येयाचे हे दर्शन विलोभनीय होते. योग,तप, तत्वज्ञान, भक्ती आणि काव्य या सर्वामध्ये येथे अमर्याद उंची गाठली गेली. ज्ञानदेवांनी सामान्य जनांना एक महान आदर्श दाखिवला. येथून पुढे ज्ञानदेवांच्या चरित्राला एक वेगळी झळकाळी प्राप्त झाली आणि ते झाले ज्ञानियांचा राजा……………
Reviews
There are no reviews yet.